आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडलला रबडीमध्ये गुंगीचे औषध देऊन अनेक महिन्यांपासून करत होता बलात्कार, 30 वर्षांचा असल्याचे सांगून केले लग्न, नंतर एका कॉलने समोर आले सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


इंदुर(मध्यप्रदेश)- फॅशन डिझाइनिंगचा कोर्स करणाऱ्या 22 वर्षीय मॉडलने व्यावसायिकावर रबडीतून गुंगीचे औषध देऊन बलात्कार करण्याचा आरोप लावला आहे. शिवाय त्याने अश्लील व्हिडिओ बनवून महिलेला ब्लॅकमेल करून अनेक महिने बलात्कार केला. त्यानंतर स्वत:अविवाहीत सांगून लग्नदेखील केले. नंतर कळाले की, त्याचे आधीच लग्न झाले आहे. तरूणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव जितेंद्र उर्फ माँटी आहे.


आरोपीने वॉट्सअॅपवरून केली मैत्री
एसआय अशरफ अली अंसारी यांनी सांगितले की, सप्टेंबर 2018 मध्ये आरोपीने वॉट्सअॅपवरून तरूणीशी मैत्री केली. त्यानंतर त्याने स्वत:ला 30 वर्षांचा सांगून तिच्याशी लग्न केले. 6 नोव्हेंबरला आरोपीने एका हॉटेलमध्ये रबडीमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा अश्लील व्हिडिओ बनवला. त्यानंतर तिला ब्लॅकमेल करून अनेक महिने तिच्यावर बलात्कार करत होता.


पत्नीचा फोन आल्यावर झाला खुलासा
मॉडलला एक दिवशी पत्नीचा कॉल आला, त्यानंतर तिला धक्का बसला. तिने सांगितले माँटीचे लग्न झाले असून त्याला 17 वर्षांचा मुलगादेखील आहे. त्यानंतर तरूणीने पोलिसांत तक्रार केली.

बातम्या आणखी आहेत...