आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर मार्चपर्यंत फास्टटॅग लेग सक्तीची केली जाईल. यासाठी नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) सोमवारपासून देशभरातील ८०० पेट्रोल पंपांवर वाहनचालकांना फास्टटॅग बारकोड उपलब्ध करून देणार आहे. हे बारकोड येत्या ६ महिन्यांत देशभरातील २५ हजार पेट्रोल पंपांवर उपलब्ध करून दिले जातील. सोबतच फास्टटॅगसाठी साहाय्यक दोन अॅपही लाँच केले जात आहेत. यामुळे टोल नाक्यांवर वाहनचालकांचा वेळ वाया जाणार नाही. टोलवर सध्या फास्टटॅग नसलेल्या एका वाहनाला सरासरी ६ मिनिटांचा वेळ लागतो.
रस्ते परिवहन मंत्रालय व एनएचएआयचे ४७९ टोल आहेत. पैकी ४२५ टोलवर फास्टटॅग लेन आहे. ५४ टोलवर मार्चपर्यंत फास्टटॅग लेन सुरू केली जाईल. यामुळे टोलची रक्कम भरण्यात वाया जाणाऱ्या वेळेची बचत होईल. फास्टटॅग लेनमध्ये इतर वाहनांना प्रवेश नसेल. एखाद्याने घुसखोरी केल्यास दंड ठोठावला जाऊ शकतो. मात्र त्याचा निर्णय झालेला नाही. सोमवारी रस्ते परिवहन मंत्रालय व ऑइल कंपन्यांत करार होत आहे. त्यात महानगरांतील २००-२०० पेट्रोल पंपांवर फास्टटॅग उपलब्ध होतील. यानंतर क्रमाक्रमाने ६ महिन्यांच्या आत मोठ्या शहरांतील २५ हजार पेट्रोल पंपांवरही ही सुविधा उपलब्ध होईल. त्यासाठी प्रत्येक पंपावर बूथ तयार केला जाईल. वाहनचालक फास्टटॅगला बँक खाते, पेटीएम आदींशी लिंक करू शकतात. त्यात सर्वच प्रमुख बँकांसाठी पर्याय उपलब्ध असेल. सध्या एनएचएआयकडून नाेंदणीकृत बँकांकडे फास्टटॅग मिळत होते. सर्व्हेनुसार, टोलवरून जाणाऱ्या ९०% चालकांना टोल भरण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. अशा वाहनचालकांसाठी सहजपणे फास्टटॅग उपलब्ध होऊ शकेल.
सेन्सरद्वारे फास्टटॅग स्कॅन होताच गेट उघडणार
फास्टटॅग हे एका प्रकारचे बारकोड स्टिकर असून ते वाहनांमध्ये लावले जाते. त्याचा कोड तुमचे बँक खाते किंवा पेटीएम खात्याशी लिंक केले जाते. जेव्हा तुम्ही टोलनाक्यावरून जाता तेव्हा थांबून रोख रक्कम देण्याची गरज नसते. फास्टटॅगयुक्त वाहने टोलच्या एंट्री गेटवर जाताच गेटवरील सेन्सर फास्टटॅग स्कॅन करून त्याची माहिती कंट्रोल रूमला देतो. ऑनलाइन टोल भरून बॅरिअर उघडले जाते.
479 टोल नाके आहेत राष्ट्रीय महामार्गांवर. 43 लाख वाहने दररोज तेथून जातात. 6 मिनिट सरासरी वेळ लागतो एका वाहनाला टोलवरून जाण्यासाठी 55 कोटी रुपयांचे दररोज टोल शुल्क जमा केले जाते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.