आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फास्टॅग आता एकऐवजी 15 डिसेंबरपासून अनिवार्य, हे आहेत फास्टॅग यंत्रणेचे फायदे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली ।  केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी एक डिसेंबरपासून फास्टॅग अनिवार्य केले होते. मात्र, आता ही मुदत १५ दिवसांनी वाढवली आहे. आता १५ डिसेंबर २०१९ पर्यंत फास्टॅग न लावलेली वाहने टोलनाक्यावरून ये-जा करू शकतील.

फास्टॅग यंत्रणेचे हे आहेत फायदे
फास्टॅग यंत्रणेमुळे वाहतूकदार, टोल प्लाझा चालक, सरकारला फायदा होईल. फास्टॅग यंत्रणेच्या वापरकर्त्या वाहतूकदाराला प्रत्येक व्यवहारावर २.५% सूट मिळणार आहे. या प्लाझावर विनाथांबा वाहतूक असल्याने वाहतूकदारांच्या वेळेची बचत होईल. ई-पेमेंटमुळे रोख रक्कम बाळगण्याची गरज भासणार नाही. या व्यवहाराची पावती थेट मेलवरच मिळणार असल्याने तसा लेखाजोखा ठेवता येणार आहे.