आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली : एक डिसेंबरपासून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) ५२० टोलनाक्यांवर फास्टॅग सुरू होईल. यामुळे येथून ये-जा करणाऱ्या सुमारे ७० लाख वाहनचालकांच्या सुमारे ३.५० तासांची बचत होईल. त्याशिवाय दरवर्षी सुमारे ७५ हजार कोटी रुपयांचे इंधनाची बचत होऊन प्रदूषणही २० टक्क्यांनी घटेल.
देशभरात एनएचएआयचे ५३७ टोलनाके आहेत. यातील १७ अद्याप सुरू नाहीत. अशा रीतीने ५२० टोलनाक्यावरील एक लेन सोडून बाकीवर फास्टॅग सुरू होईल. या लेनवरून फास्टॅग नसणारी वाहने अर्थात रोख रक्कम देणारी वाहने जातील. मात्र, एकच लेन असल्याने तेथे लांबच लांब रांगा लागणे निश्चित आहे. टोलवर वाहनामागे सरासरी वेळ ४ मिनिट लागतो. अशा रीतीने ४.६६ लाख तास रोज टोलवर वाया जात आहेत. फास्टॅगनंतर हा वेळ २५ टक्क्यांनी घटून सुमारे एक मिनिटावर येईल. ७० लाख वाहनांचे तीन-तीन मिनिट वाचतील. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे माजी अध्यक्ष एस. के. मित्तल यांनी सांगितले की, टोलवर होणारी वाहतूक कोंडीमुळे दरवर्षी १ लाख कोटी रुपयांचे इंधन वाया जाते. फास्टॅगमुळे २५ टक्केच वेळ लागणार असल्याने हे नुकसान घटून २५ हजार कोटी रुपयांची बचत होईल. ३० नोव्हेंबरपर्यंत एनएचएआयद्वारे फास्टॅग मोफत उपलब्ध असून १५० रुपयांचा रिचार्ज करण्यात येत आहे. त्याशिवाय फास्टॅगद्वारे रक्कम दिल्यास २.५% कॅशबॅक मिळेल.
या राज्यांतील टोल नाक्यांवर सुरू होतील फास्टॅग
रस्ते वाहतूक मंत्रालयाचा काही राज्यांबरोबर करार झाला आहे. त्याअंतर्गत तेथील टोलनाक्यांवर एक डिसेंबरपासून फास्टॅग सुरू होईल. यात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राचा समावेश आहे. राजस्थान, गुजरात, हरियाणा, तामिळनाडू आणि पंजाबमध्ये लवकरच याची सुरुवात होईल.
टोलद्वारे वर्षभरात ३० हजार कोटी मिळवणार
- देशात राष्ट्रीय महामार्गाची लांबी १.४० किमी आहे.
- सध्या २४,९९६ किमी महामार्गावर होत आहे टोलवसुली.
- अातापर्यंत ६६,१९०५५ फास्टॅक वितरित झाले आहेत.
- चारचाकी आणि बस-ट्रकसाठी वेगवेगळी फास्टॅग राहील
- फास्टॅग नसलेले वाहन फास्टॅग लेनमध्ये आल्यास दुप्पट टोल.
- एका वर्षात २४. ३९६ हजार कोटी टोलची वसुली होत आहे. लक्ष्य ३० हजार कोटी रु. चे आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.