आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनांसाठी 'फास्टॅग' प्रणालीची आजपासून देशभरात अंमलबजावणी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : टाेल प्लाझावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अाणि टाेल टॅक्स वसुली साेपी करण्यासाठी लागू करण्यात अालेल्या फास्टॅग प्रणालीची अंमलबजावणी अाज मध्यरात्रीपासून देशभरात करण्यात येणार अाहे. राष्ट्रीय इलेक्ट्राॅनिक टाेल संग्रह (एनईटीसी) कार्यक्रमांतर्गत लागू हाेत असलेल्या या प्रणालीमध्ये१०० टक्के टाेल वसुली इलेक्ट्राॅनिक पद्धतीने करण्यात येईल.

चुकीच्या मार्गिकेत घुसल्यास टाेल टॅक्स दुप्पट

टाेल टॅक्स वसुली इलेक्ट्राॅनिक केल्यानंतर ही व्यवस्था अगाेदर एक डिसेंबरपासून लागू हाेणार हाेती. परंतु, सर्व टाेल प्लाझा पूर्णपणे तयार नसल्याने याची अंमलबजावणी १५ डिसेंबरपासून करण्याचा निर्णय घेण्यात अाला. रस्ते परिवहन मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर जर फास्टॅग नसलेला एखादा वाहनचालक फास्टॅगच्या मार्गिकेत घुसला तर त्याच्याकडून दुप्पट टाेल वसूल केला जाईल. परंतु, अाताही सर्वच वाहनांना फास्टॅग लागलेला नाही. ज्या वाहनांमध्ये फास्टॅग प्रणाली लागलेली नाही त्यांच्यासाठी टाेल प्लाझावर हायब्रीड मार्गिका बनवली अाहे. त्या मार्गिकेमध्ये फास्टॅग साेडून अन्य सर्व प्रकारचे टाेल टॅक्स घेतला जाईल.

२१ नाेव्हेंबरपासून माेफत फास्टॅग

केंद्र सरकारने १ डिसेंबरच्या अाधी जास्तीत जास्त फास्टॅग वितरित करण्याच्या उद्देशाने २१नाेव्हेंबरपासून त्याची माेफत विक्री करण्याची घाेषणा केली अाहे. माेफत फास्टॅग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सर्व टाेल प्लाझा, प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरून घेऊ शकता येतील. माेफत फास्टॅगसाठी वाहनांचे नाेंदणी प्रमाणपत्र व चालक परवानाच्या झेराॅक्स प्रत द्यावी लागेल. या शिवाय अनेक बंॅका माेफत फास्टॅग देत अाहेत.
 

बातम्या आणखी आहेत...