आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Fastag Vehicles 40 Percent, Tend To Pay Toll With Cash, Due To Lake Of Public Awareness, There Is Still A High Number Of No Fasttag Vehicles On The Highway.

फास्टॅग वाहने 40 टक्के, रोखीने टोल भरण्याकडे कल, जनजागृतीअभावी अद्यापही महामार्गावर फास्टटॅग नसणाऱ्या वाहनांची संख्या जास्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तळेगाव दाभाडे टोलनाका; फास्टटॅग स्कॅनिंगमध्ये वाहनाधारकांना अनेक अडचणी; रोख टोल भरण्याच्या लेनमध्ये वाहनांच्या रांगा - Divya Marathi
तळेगाव दाभाडे टोलनाका; फास्टटॅग स्कॅनिंगमध्ये वाहनाधारकांना अनेक अडचणी; रोख टोल भरण्याच्या लेनमध्ये वाहनांच्या रांगा

मंगेश फल्ले/पुणे : केंद्र सरकारच्या २०१३ मधील सूचनेनुसार महाराष्ट्रात प्रथमच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर 'फास्टॅग' सुविधा सुरू करण्यात आली हाेती. परंतु याबाबत जनजागृती पुरेशी न झाल्याने वाहनांच्या रांगा लागायच्या. मात्र, १५ जानेवारीपासून राष्ट्रीय महामार्गावर फास्टॅग बंधनकारक केल्याने मागील दाेन महिन्यात फास्टॅग असलेल्या वाहनांची संख्या सुमारे ४० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. मात्र, फास्टॅगबाबत अद्याप गाेंधळ असल्याने राेखीने टाेल भरणाऱ्यांची संख्या माेठी असल्याचे दिसून येत आहे.

द्रुतगती महामार्गावर ट्रक, कंटेनरसारखी अवजड वाहने, बस, एसटी यांच्यात फास्टॅगबाबत जागृती दिसते. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या बहुतांश वाहनांवर फास्टॅग दिसते. परंतु कारने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये फास्टॅगबाबत अद्याप गाेंधळ आहे. त्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. ज्या वाहनांचे फास्टॅग स्क्रीनिंग याेग्य प्रकारे हाेत नाही ते पुन्हा तपासणीकरिता नाक्यावर फास्टॅग स्क्रीनिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, वाहनावर फास्टॅग लावून ही बँक खात्यात किंवा अाॅनलाइन वाॅलेटमध्ये पुरेसे पैसे नसल्याने राेखीने पैसे देण्याकडे चालकांचा कल दिसून आला. फास्टॅगमधील तांत्रिक चुकांमुळे गाेंधळ उडून कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्याचा प्रकारही हाेत आहेत. अद्याप द्रुतगती महामार्ग प्रशासनाकडे ज्या वाहनांनी फास्टॅग लावलेला नाही त्यांच्याकडून दुप्पट टाेल आकारण्यात यावा असे परिपत्रक आलेले नसल्याने दुप्पट टाेल अद्याप टाेलनाक्यावर घेतला जात नाही.

द्रुतगती महामार्गावर दरराेज २० हजार वाहनांची ये-जा

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील तळेगाव दाभाडे टाेलनाक्याचे मॅनेजर उमेश यादव यांनी सांगितले की, महामार्गावरून दररोज सुमारे २० वाहने ये-जा करतात. सुरुवातीला एक ते दीड हजार फास्टॅग असणाऱ्या वाहनांची संख्या आता ७ ते ८ हजारांपर्यंत पाेहोचली आहे. वाहनचालकांचे तक्रारींचे निवारण करण्याकरिता 7888007090 आणि सहकार ग्लाेबल या कंपनीच्या ईमेल आयडीवर संर्पक साधावा.

अशा प्रकारे आहे फास्टॅग क्रमांक

प्रत्येक फास्टॅगवर विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यानुसार टाेलनाक्यावर वाहनांचा कर वसूल केला जात आहे. सदर क्रमांक अशा प्रकारे कार : ४ टेम्पाे, पिकअप वाहन : ५ सहा टायरच्या गाड्या : ६ दहा टायरच्या गाड्या : ७ १४ टायरच्या गाड्या : १२

ज्या वाहनांवर संबंधित क्रमांक लागले जातात त्यांच्याकडून अधिक प्रमाणात टाेल वसुलीच्या तक्रारी येत आहे, तर एखाद्या वाहनावर ठरावीक क्रमांकाएेवजी कमी किमतीचा फास्टॅग बॅच लावण्यात आला असेल तर टाेलनाक्यावरील स्क्रीनिंग मशीनवर ते दिसून येते आणि अधिकची रक्कम घेतली जात आहे.

महिन्याला ६०० ते ७०० वाहनांना फास्टॅग

द्रुतगती महामार्गावर तत्काळ फास्टॅग सुविधा उपलब्ध करून देणारे कर्मचारी मंगेश पारखी व लक्ष्मण पारखी यांनी सांगितले की, विविध बँका, पेटीएम, माेबाइल कंपन्यांच्या माध्यमातून फास्टॅग घेता येते. अाॅनलाइन ५०० रुपये रिचार्ज करावा लागतो. यातील १५० रुपये काही काळाने ते पुन्हा खात्यात जमा केले जात आहेत. आमच्याकडे महिन्याला ६०० ते ७०० वाहने फास्टॅग घेताहेत.

याेजना चांगली, रुळण्यास वेळ

पुण्यावरून मुंबईकडे कुटुंबासह कारने निघालेले गणेश झरकर म्हणाले, फास्टॅग याेजना चांगली आहे. टाेलनाक्यावर त्यामुळे वेळ जात नाही. मात्र, फास्टॅग वाॅलेट वेळेत रिचार्ज न हाेण्याची अडचण मला जाणवली. याेजनेतील तृटी दूर हाेऊन ती रुळण्यास वेळ लागेल.

लातूरचे अभिजित रुमणे म्हणाले, केंद्र सरकारची याेजना चांगली असली तरी तिची अंमलबजावणी व्यवस्थित प्रकारे हाेणे अपेक्षित आहे.

फास्टॅगमुळे जास्त पैसे जातात

सांगलीवरून ट्रक घेऊन गुजरातला निघालेले संदीप पाेखरे म्हणाले, माझा ट्रान्सपाेर्टचा व्यवसाय असून फास्टॅगमुळे अधिक पैसे कपात हाेत असल्याचा अनुभव मला येत आहे. महामार्गावरील दाेन टाेलचे मिळून ४९३ एेवजी माझे ६७५ रुपये घेतले गेले आहे, नेमकी तक्रार याबाबत काेणाकडे करायची हा प्रश्न माझ्यासमाेर आहे. अशिक्षित वाहनचालकांनी काेणाला संर्पक करायचा तसेच तांत्रिक बाबींचा पाठपुरावा कसा करायचा हा प्रश्न आहे.

पिपळगाव बसवंत टोलनाका, निफाड, नाशिक; दररोज ये-जा करणारी वाहने फास्टटॅगविनाच

तुषार झोडगे/ओझर : पिंपळगाव टोलनाक्यावरून दररोज १८ ते २० हजार वाहने ये-जा करतात. यामध्ये अंदाजे साडेअकरा हजार वाहनांना फास्टटॅग असून दररोज ये - जा करणाऱ्या ८००० वाहनांना फास्टॅग नसल्याने कॅशलाइनमधून जातात. या टोलनाक्यावर रोज शंभर ते सव्वाशे फास्टॅगची विक्री होते.

वेळ, इंधनाची बचत

फास्टॅग आल्यामुळे वाहनधारकांच्या वेळेची व इंधनाची बचत होत असून वाहनधारकांनी लवकरात लवकर नाशिक जिल्ह्यासह पिंपळगाव व टोलनाक्यापासून वीस किलोमीटर अंतरावरील वाहनांनी आपली कागदपत्रे जमा करावी व स्थानिक वाहनधारकांनी कागदपत्रे जमा करून सवलत घ्यावी, फास्टॅग लावल्यामुळे टोल नाक्यावर पूर्वीपेक्षा गर्दी कमी झाली असून वाहनधारकांच्या वेळेची बचत होत आहे तसेच या मुळे ताण कमी झाला. - हर्षल चौधरी, व्यवस्थापक, पिंपळगाव बसवंत टोलनाका 

फास्टॅग नसल्याने आमचा एक तास वाया गेला जर फास्टॅग असता तर वेळेची बचत झाली असती. - दिनकर देवरे, देवळा

फास्टॅग घ्या, वेळ वाचवा

फास्टॅग नसल्याने माझा एक तास वाया गेला, परंतु फास्ट काढण्यासाठी आल्यानंतर फक्त पंधरा मिनिटांत फास्टॅग मिळवून तो कार्यान्वित झाला त्यामुळे सर्वांनी फास्टॅग त्वरित करून घ्यावा व आपला वेळ वाचवावा. - कौतिक पवार, देवळा

सातबारा दिल्यास पिकअपला टोल नाही

िंपंपळगाव ते २० किलोमीटर कक्षेतील शेतकऱ्यांच्या पिकअप वाहनांना टोल लागणार नाही, मात्र त्यासाठी आधार कार्ड , मतदान कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट यापैकी एक व आरसी बुक अनिवार्य व तलाठ्याचा सही व शिक्का असलेला सातबारा उतारा द्यावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...