आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- हायवेवर प्रवास करणाऱ्या लोकांना आजपासून लांब रांगेत नाही थांबावे लागणार. देशातील 800 पेट्रोल पंपांवर सोमवारपासून फास्टॅग बारकोड उपलब्ध केले जातील. मार्चपर्यंत देशातील सगळ्या नॅशनल हायवेच्या टोल प्लाजावर फास्टॅग बारकोड अनिवार्य असतील. प्रवासी पुढील 6 महीन्यांपर्यंत देशभरातील 25 हजार पेट्रोल पंपांवरून या बारकोड खरेदी करू शकता.
फास्टॅग्सच्या उपलब्धतेला निश्चीक करण्यासाठी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारे प्रवर्तित कंपनी भारतीय राजमार्ग प्रबंधन कंपनी लिमिटेड (IHMCL) 7 जानेवारी 2019 ला राज्य सरकार द्वारे संचालित तेल विपणन कंपन्या (IOCL,BPC आमि HPC) सोबत टायअपच्या पेपरवर साइन करणार आहे. पहिल्या टप्प्यात फास्टॅग बारकोड दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या 50 तेल स्टेशनवर उपलब्ध होतील, त्यानंतर याला भारतातील सगळ्या ठिकाणी उपलब्ध केले जातील.
काय आहे फास्टॅग बारकोड
फास्टॅग बारकोडने हायवेच्या टोलप्लाजामध्ये लागलेल्या लांब लाइनला संपवता येईल. फास्टॅग एक बारकोड स्टीकर आहे ज्याला गाड्यावर लावले जाते. हे बारकोड पेटीएम आणि बँक अकाउंटला लिंक असते. या बारकोड स्टीकर लावलेल्या गाड्यांना कोणत्याही टोल नाक्यावरून जाताना पैसे नाही द्यावे लागणार. त्याशिवाय टोलवर लागलेले सेंसर गाडीवरील बारकोड स्कॅन करतील आणि तुमची पेमेंट अपोआप होईल. हे स्टीकर लावलेल्या वाहनांची एक वेगळी लाइन असेल.
देशभरातील नॅशनल हायवेवर 479 टोल प्लाजा
देशभरातील नॅशनल हायवेवर 479 टोल प्लाजा आहेत. या टोल प्लाजावरून रोज 43 लाख वाहने जातात. या 479 टोल प्लाजापैकी 425 मध्ये फास्टॅग लेन उपलब्ध आहे. तर बाकी उर्वरित टोल प्लाजावर मार्चपर्यंत ही लेन उपलब्ध होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.