आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Fastest Growth In The Manufacturing Sector In The Last Eight Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जानेवारीत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये गेल्या आठ वर्षांत सर्वात वेगवान वाढ

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेतील मरगळीत एक सकारात्मक संकेत मिळाला आहे. देशाच्या मॅन्युफॅक्चरिंग(निर्मिती) क्षेत्रातील उत्पादन जानेवारी जवळपास ८ वर्षांत सर्वात वेगाने वाढले आहे. जानेवारीत या क्षेत्राचा परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स(पीएमआय) ५५.३० नाेंदला आहे. हा डिसेंबरमध्ये ५२.७० वर हाेता. ही माहिती आयएचएस मार्केटच्या मासिक सर्वेक्षणात समाेर आली आहे. त्यानुसार, मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनात तेजी आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी वाढण्याचे महत्त्वाचे याेगदान राहिले. नवी आॅर्डर मिळण्याच्या वेगातही तेजी दिसली. या कारणास्तव कंपन्यांनी आपले उत्पादन वाढवले. कर्मचाऱ्यांची अधिक नियुक्तीही केली आहे. जानेवारी सलग ३० वा असा महिना राहिला जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय इंडेक्स ५० वर राहिला. पीएमआय इंडेक्स ५० पेक्षा जास्त राहणे क्षेत्रातील उत्पादनात वाढ हाेणे आणि ५० पेक्षा कमी राहणे उत्पादन घटल्याचा सूचक मानला जाताे. आयएचएस मार्केटच्या मुख्य अर्थतज्ञ डी.िलमा म्हणाल्या, जानेवारीत देशात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात बळकट वृद्धी नाेंदली आहे. भारतीय मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पुढील वर्षाच्या अवधीत उत्पादन वाढण्याबाबत उत्साह आहे. ते मागणी चांगली राहणे, नवे ग्राहक मिळणे, मार्केटिंगचे प्रयत्न, उत्पादन क्षमतेचा विस्तार आणि नव्या प्राेडक्ट्स बाजारात सादर करण्याबाबत आशावादी आहे.व्यावसायिक धारणेत सुधारणेचे संकेत

जानेवारीत नवी आॅर्डर मिळाल्याने उत्पादनासाठी खरेदी, उत्पादन, निर्यात आणि राेजगारात वाढ दिसली. यासाेबत व्यावसायिक धारणेत सुधारणा नाेंदली. जानेवारीत मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय उच्च स्तरावर असणे म्हणजे, मागणीत सुधारणा असते. यामुळे नवी आॅर्डर मिळणे, उत्पादन, निर्यात आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी खरेदी आणि राेजगारात वाढ दिसली. यासाेबत व्यावसायिक धारणेतही सुधारणा झाली. लिमा म्हणाल्या, जानेवारीत देशात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात बळकट वृद्धी नाेंदली आहे. यामुळे वातावरणात ज्याप्रमाणे सुधारणा दिसली, तसे गेल्या आठ वर्षांच्या अवधीत दिसले नाही.नवीन आॅर्डरचा वेग ५ वर्षांत सर्वाधिक

कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, नवी आॅर्डर मिळाल्याने जी बळकटी आली ती गेल्या ५ वर्षांत दिसली नाही. हे मागणी वाढणे,ग्राहकांच्या गरजेच्या सुधारणेमुळे झाले.

निर्यात आॅर्डरमध्ये  २०१८ नंतर वा

कंपन्यांच्या एकूण विक्रीत विदेशी बाजारांत वाढलेली मागणी महत्त्वाची भूमिका ठरली. ही नाेव्हें. २०१८ नंतर निर्यातीच्या नव्या आॅर्डरमध्ये वेगवान वाढ आहे.

राेजगारात ७.५ वर्षांत वेगवान वृद्धी

जानेवारीमध्ये राेजगार वृद्धीतही सुधारणा दिसली. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात राेजगाराचा दर साडेसात वर्षांत सर्वात तेज राहिला आहे.पतधाेरण आढाव्यावर उद्योग जगताचे लक्ष


उद्योग जगतास रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्याची प्रतीक्षा आहे. यात मागणी वाढणे, आर्थिक वृद्धीच्या  मदतीसाठी उपाय होऊ शकतात.