उपवासाच्या दिवशी या गोष्टी विसरू नका

धर्म डेस्क, उजैन | Update - May 24, 2011, 06:39 PM IST

संकल्प किंवा दृढ निश्चयालाच व्रत किंवा उपवास म्हटले जाते. उपवास म्हणजे ईश्वराच्या सानिध्यात रहाणे. भारतीय संस्कृतीत उपवास करण्याला फार महत्त्व आहे.

 • fasting-day  संकल्प किंवा दृढ निश्चयालाच व्रत किंवा उपवास म्हटले जाते. उपवास म्हणजे ईश्वराच्या सानिध्यात रहाणे. भारतीय संस्कृतीत उपवास करण्याला फार महत्त्व आहे. तसे पहायला गेले तर आपल्या देशात दररोज कोणत्या तरी इष्टदेवतेच्या नावे उपवास करण्यात येत असते. सर्वच उपासना पद्धतींमध्ये उपवासाचे महत्त्व सांगितले गेले आहे. त्यामुळे प्रत्येक संप्रदायांमध्ये लोक आपल्या धर्म परंपरेनुसार उपवास किंवा व्रत करताना आढळतात. तसे पहायला गेले तर व्रत उपवासाचा संबंध हा शरीर आणि मनाच्या शुद्धतेशी आहे. याने आपले शरीर निरोगी रहायला मदत होते.
  उपवासाचे ढोबळ मानाने 3 प्रकार पडतात...
  1. नित्य ... जे व्रत भगवंताला प्रसन्न करून घेण्यासाठी निरंतर केले जाते.
  2. नैमित्तिक... हे व्रत कोणत्या तरी निमित्ताने करण्यात येते.
  3. काम्य... कोणती तरी कामना मनात ठेऊन हे व्रत केले जते.
  लाभ... व्रत उपवासामुळे शरीर निरोगी रहाते. निराहार राहिल्याने, एकवेळ जेवल्याने किंवा फलाहार केल्याने पचनसंस्थेला विश्रांती मिळते. यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, अजीर्ण, डोकेदुखी यासारख्या व्याधींपासून मुक्ती मिळते. आध्यात्मिक उन्नती होते. ज्ञान, विचार, पवित्रता आणि बुद्धीच्या विकासाला चालना मिळते. यामुळेच उपवासाला धार्मिक गोष्टींशी जोडले गेले आहे.  कोणी करू नये ... संन्याशी, बालक, रुग्ण, गर्भवती स्त्री, वृद्ध यांनी उपवास केले नाही तरी चालते.
  उपवासाचे नियम ... कोणत्याही प्रकारची हिंसा करू नका. दिवसा झोपू नका. अधिक पाणी पिऊ नका. खोटे बोलू नका. कोणाबद्दल वाईट विचारही करू नका. व्यसन टाळा. भ्रष्टाचार करणार नाही असा संकल्प घ्या. चित्रपट, टी.व्ही. आदी मनाला दुर्बल करणा:या गोष्टींपासून दूर राहा.Trending