आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरमध्‍ये ट्रकने जोरदार धडक दिल्‍याने रिक्षाचा अक्षरश: चुराडा, 5 जणांचा मृत्‍यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर-सावनेर मार्गावर वरोडा शिवारात भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ऑटोतील ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर ५ प्रवासी गंभीर जखमी झाले. मृतात ३ बालके, १ महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. 


मोहरमनिमित्त नागपुरातील ताजबाग परिसरातील काही भाविक वरोडा शिवारातील चाँदशाह दर्ग्याकडे ऑटोने जात होते. कळमेश्वर-सावनेर मार्गावर वरोडा शिवारातील पोल्ट्री फार्मजवळ सावनेरकडून कळमेश्वरकडे जाणाऱ्या या भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिली. यात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.   


पाचही जणांचे मृतदेह कळमेश्वर येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी सध्या तणावाचे वातावरण आहे. काहींच्या मते मृत हे नागपुरातील राहणारे आहेत. ते हैदराबाद येथील रहिवासी असल्याचे जखमींपैकी एकाने सांगितले. नागपुरातील नातेवाइकाकडे ते पाहुणे म्हणून आले होते.

 

बातम्या आणखी आहेत...