आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील-मुलीच्या नात्याला काळिमा , १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या दारूड्या बापाला अटक....

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

|बीड- बारा वर्षाच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या दारूड्या बापाला बीड ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. नात्याला काळीमा फासणारी ही घटना बीड तालुक्यातील एका गावात सोमवारी उघडकीस आली. 


बीड तालुक्यातील एका गावात दारूड्या बाप दारुच्या आहारी गेला होता. पतीच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून त्याची पत्नी वर्षभरापासून माहेरी राहत आहे. या दाम्पत्यास दोन मुली व एक मुलगा आहे. मोठी मुलगी गावातील शाळेत सहावीच्या वर्गात शिकते. तिलाच स्वयंपाक व दोन भावंडांचा सांभाळ करावा लागतो होता काही दिवसांपासून बापाने रात्रीच्या वेळी मुलीवर सतत अत्याचार केला. मुलीने विरोध केल्यानंतर तो भावंडांना मारहाण करत असे. सोमवारी पहाटे त्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न करताच मुलीने विरोध केला. त्यानंतर त्याने मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. बापाकडून होत असलेल्या मारहाणीची माहिती मुलांनी बीड ग्रामीण पोलिसांना कळाली. त्यावरून पोलिस गावात पोहोचले तेव्हा अत्याचाराचा प्रकार समोर आला. पीडित मुलीचा फौजदार स्वाती लामखेडे यांनी जवाब नोंदवला.  

 

बातम्या आणखी आहेत...