आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराईगलहॉक नेक (टास्मानिया) - टास्मानियाच्या मॅट जर्बो यांनी मुलांसाठी ३६५ गोष्टी लिहिण्याचे आव्हान स्वीकारले आहे. या गोष्टी त्यांनी आपली २० महिन्यांची मुलगी सिएलोला भेट देण्यासाठी लिहिल्या आहेत. १३ जुलैपर्यंत त्यांनी ३३४ गोष्टी लिहिल्या आहेत. सीपच्या (ऑयस्टर) फार्ममध्ये काम करणारे मॅट रात्री या गोष्टी लिहितात.
याआधी त्यांनी ४ कादंबऱ्या आणि मुलांसाठी ८ पुस्तके लिहिली आहेत. मॅट रात्री १० वाजता लिहिण्यास सुरुवात करतात, रात्री १ वाजेपर्यंत गोष्ट लिहून पोस्ट करतात. मॅट सांगतात की, मुलांना गोष्टी आवडतात. तुम्ही त्यांना वारसा म्हणून चांगली शिकवण, संस्कार आणि प्रेरणा यामार्फतच देऊ शकता. मलाही मुलीला चांगले विश्व द्यायचे आहे. त्यामुळे काही तरी करावेच लागेल. त्यामुळे गोष्टींपासून सुरुवात केली. हिंसा आणि अज्ञान पूर्वीही होते आणि राहील, त्यांना कल्पनेतूच नष्ट करता येईल. लेखनाबाबत मॅट म्हणाले की, जेव्हा मी दोन वर्षांचा होतो, तेव्हाच आई-वडील विभक्त झाले होते. कोणी लक्ष देणारे नव्हते. त्यामुळे फिरण्याची संधी जास्त मिळाली. पण आयुष्याचा काहीच हेतू नव्हता, त्यामुळे आत्महत्येचा विचार मनात येत असे. त्यातून बाहेर पडण्यासाठी लेखनाची मदत घेतली. दरम्यान, ऑयस्टर फार्ममध्ये नोकरी मिळाली. तीन वर्षांपूर्वीच एलिनाशी भेट झाली. आर्किटेक्ट असलेली ३८ वर्षीय एलिना व्हेनेझुएलाची आहे. ती सुट्यांसाठी टास्मानियाला आली होती. तेव्हा दोघांची भेट झाली. दीड वर्षापूर्वीच सिएलोचा जन्म झाला. मुलीच्या जन्माची आठवण म्हणून मी गोष्टी लिहिण्यास सुरुवात केली.
१९९७ मध्ये मॅटची पहिली कादंबरी ठरली होती बुक ऑफ द इयर
१९९७ मध्ये मॅटची इडियट प्राइड ही पहिली कादंबरी आली होती. तिला ऑस्ट्रेलियात बुक ऑफ द इयर जाहीर केले होते. मॅटच्या मते, मी चांगला पिता बनण्याचा प्रयत्न करत आहे. मुलीला प्रेम देत आहे. माझी प्रत्येक कथा संदेश देते आणि नात्यांत विश्वास निर्माण करते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.