आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२३ महिन्यांच्या चिमुकलीला चांगले आयुष्य, घर मिळावे म्हणून कमाईसाठी जात होते वडील; पण नदी ओलांडताना बाप-लेकीचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - हृदय पिळवटून टाकणारे हे छायाचित्र अमेरिका-मेक्सिको सीमेवरील आहे. ऑस्कर मार्टिनेज रामिरेज मुलगी वालेरियाला पाठीशी घेऊन ग्रांडे नदी आेलांडण्याच्या प्रयत्नात बुडाले. अल-सॅल्वाडोर सोडून ते अमेरिकेच्या दिशेने जात होते. सनवीन आयुष्याच्या शोधात निघालेल्या या बाप-लेकीला मात्र मृत्यूने मध्येच गाठले. अल्बर्टो २३ महिन्यांच्या चिमुरडीला टी-शर्टमध्ये अडकवून नदी पार करण्याचा प्रयत्न करत होते. मुलीनेही विश्वासाने वडिलांच्या गळ्याभोवती हात टाकले होते. परंतु त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. अल्बर्टो खूप दिवसांपासून अमेरिकेत आश्रयासाठी झटत होते. मात्र, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसमोर ते स्वत:ला योग्य प्रकारे सिद्ध करू शकत नव्हते. त्यामुळे हैराण झालेल्या अल्बर्टो यांनी रविवारी मुलगी वालेरिया व पत्नी तानिया वानेसा अवालोस यांच्यासह रियो ग्रांडे नदी पार करण्याचे ठरवले होते. या आधी अल्बर्टो यांनी मुलीला घेऊन नदी पार केली होती. मुलीला किनाऱ्यावर सोडून पत्नी तानियाला आणण्यासाठी परत जाणार होते. पण वडिलांना दूर जाताना पाहून मुलीने नदीत उडी मारली. मुलीला वाचवण्यासाठी अल्बर्टो परतले. वालेरियाला धरले. पण दोघेही वाहून गेले. 

 

बुडालेल्या ठिकाणापासून दीड किमीवर होता पूल

वडिलांचा मृतदेह व मुलीचे कलेवर मेक्सिकोच्या माटामोरोसमध्ये आढळून आले. हे ठिकाण अमेरिकेतील टेक्सास सीमेपासून काही अंतरावर आहे. अल्बर्टो यांनी मुलीसह नदी पार करण्याचा प्रयत्न केला. ते ठिकाण आंतरराष्ट्रीय पुलापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. हा भाग अमेरिका व मेक्सिकोला जाेडणारा आहे. प्रशासनाने मुलगी व वडिलास शोधण्याची मोहीम रविवारी रात्र झाल्यामुळे थांबवली होती. मेक्सिकोचे राष्ट्रपती अँड्र्यूज मॅन्युअल लोपेझ यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. 

 

आजी म्हणाली, दोन महिन्यांपूर्वीच गेले होते..

अल्बर्टो यांची आई रोजा रामिरेज म्हणाल्या, मी त्याला घर सोडून अमेरिकेला जाऊ नको, असे बजावले होते. पण त्याने ऐकले नाही. तो पैसा कमावून स्वत:चे घर घेऊ इच्छित होता. मुलीने उडी मारून अल्बर्टोपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. तिच्यापर्यंत पोहोचेपर्यंत ती खूप लांब गेली होती. त्यामुळे त्याने मुलीसोबतच जाण्याचा निर्णय घेतला असावा. त्याने ३ एप्रिलला अल-सॅल्वाडोर सोडले होते. दोन महिने तो ग्वाटेमालातील निर्वासितांच्या छावणीत राहिला होता. ही छावणी मेक्सिको सीमेजवळ आहे.