आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोबर गॅस टाकी स्वच्छ करताना बाप-लेकाचा मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - तालुक्यातील हिंगणी गावात वाखारेवाडी येथे राहणारे शेतकरी विष्णू पोपट वाखारे (५०) आणि त्यांचा मुलगा अजित विष्णू वाखारे (२८) हे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गोबर गॅसची टाकी साफ करण्याकरता टाकत उतरले असताना आतील वायूने गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

 


तालुक्यातील हिंगणी या गावात वाखारवाडी येथे रहिवाशी असलेले शेतकरी कुटुंबातील विष्णू पोपट वाखारे व त्यांचा मुलगा अजित वाखारे हे साडेचार पाच वाजेच्या सुमारास घरासमोरील गोबर गेसची टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरले होते. बराच वेळ झाला, तरी दोघेही बाहेर येत नसल्याने आवाज देत घरातील मंडळींनी पाहिले असता दोघेही बेशुद्ध असल्याचे दिसले. शेजारी व नातेवाईकानी दोघांना बाहेर काढले व शिरूर येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. मात्र, त्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. रात्री उशिरा उत्तरीय तपासणीनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...