आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हजारीबाग (झारखंड) - शहराला लागून असलेल्या एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एक वासनांध बाप आपल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागच्या तीन वर्षांपासून बलात्कार करत होता. अखेर आईने महिला पोलिसांत बलात्कारी बापाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तत्परतेने आरोपी बाप संजीत राणाला अटक करून शनिवारी तुरुंगात रवानगी केली आहे. आरोपी बापावर भादंवि कलम 323, 324, 325, 342, 504, 506, 509, 376(3) व पॉक्सो अॅक्ट 4/6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीने पोलिसांत दिली अशी तक्रार...
पीडित मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, गत तीन वर्षांपासून हिचा बाप दारू पिऊन मारहाण करतो. आम्हाला बेदम मारतो. भीतीमुळे एवढे दिवस गप्प होते. 3 जानेवारी रोजी रात्री तो दारू पिऊन आला आणि अख्ख्या कुटुंबासमोर मुलीलाच अश्लील शिवीगाळ केली आणि बलात्काराचा प्रयत्न केला. याची माहिती आजूबाजूच्या लोकांना झाली. त्यांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो ऐकला नाही. अखेर त्रस्त होऊन आम्ही पोलिसांत धाव घेतली.
पतीच्या या कृत्यामुळे पत्नी खूप भ्यायलेली होती...
याबाबत लीगल लिट्रेसी क्लब यूनिवर्सिटी लॉ कॉलेजच्या महिला सदस्यांनी माहिती दिली की, आम्हाला याची माहिती मिळाली तेव्हा आम्ही मुलीला विश्वासात घेऊन सर्व प्रकार जाणून घेतला. मुलीची आईसुद्धा खूप भ्यायलेली होती. तिला धीर देऊन आम्ही पोलिसांत नेले. दुसरीकडे आरोपी बापाला धरून महिला पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर आम्ही सर्व निघून गेलो. नंतर जेव्हा फोनवर माहिती घेतली तेव्हा कळले की, आरोपी बाप शौचाला जाण्याचा बहाणा करून ठाण्यातून पळून गेला आहे. याची माहिती चाइल्ड प्रोटेक्शन अधिकारी सहदेव साव यांना दिली. एसपी मयूर पटेल यांनाही कळवण्यात आले. तेव्हा कुठे पोलिसांनी अॅक्शन घेतली आणि संजीत राणाला त्याच्या राहत्या घरातून अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. महिला पोलिस ठाण्याच्या प्रभारी बेबी झा यांनी सांगितले की, पोलिसांनी वेगाने कारवाई केली आहे. आरोपी बापाला अटक करून तुरुंगात डांबण्यात आले आहे. तर मुलीच्या वैद्यकीय तपासणीसाठी तिला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. 164 चे जबाब कोर्टापुढे नोंदवले जातील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.