Home | National | Delhi | father attacks sleeping daughters and mother with iron rod, one killed in national capital

झोपलेल्या पत्नीसह दोन लेकींवर बापाने केले वार: एकीचा मृत्यू, दोघी गंभीर; Shocking होते कारण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 29, 2018, 01:07 PM IST

मायलेकींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी छोट्या मुलीला मृत घोषित केले.

 • father attacks sleeping daughters and mother with iron rod, one killed in national capital

  नवी दिल्ली - दिल्लीतील संगम विहार परिसरात एका व्यक्तीने आपल्याच पत्नी आणि दोन तरुण मुलींवर रॉडने जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला त्याने मंगळवारी भल्या पहाटे त्या झोपेत असताना केला. आरडा-ओरड ऐकूण रुममध्ये आलेल्या मुलाने बापाला रोखले. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. मायलेकींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी छोट्या मुलीला मृत घोषित केले. तर आई आणि मोठी मुलगी जगण्याचा संघर्ष करत आहेत.


  विकट आर्थिक परिस्थितीमुळे मुलींचे लग्न करू शकत नव्हता आरोपी
  > पोलिसांनी या प्रकरणात 55 वर्षीय आरोपी नंद किशोरला अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत त्याने हे पाऊल आर्थिक परिस्थितीमुळे घेतल्याची कबुली दिली. वयात आलेल्या मुलींचे लग्न करू शकत नव्हता. त्यामुळेच आपण हा निर्णय घेतला असे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिस सध्या त्याची कसून चौकशी करत आहेत.
  > आरोपी मूळचा बिहारचा रहिवासी आहे. तो आपल्या पत्नी, तीन मुली आणि तीन मुलांसोबत राहत होता. त्याचे सायकल रिपेअरिंगचे एक दुकान आहे. मोठ्या मुलीचा विवाह यापूर्वीच झाला. तर दोन मुली सुमन (24) आणि कविता (22) यांच्या लग्नाची त्याला चिंता होती. मोठा मुलगा मॉलमध्ये नोकरी करतो, तर उर्वरीत दोन मुले सध्या शाळेत आहेत.


  झोपेत असतानाच रॉडने केला हल्ला
  आरोपीची पत्नी विद्यावती घराच्या अंडरग्राउंडमध्ये आपल्या दोन मुलींसह झोपली होती. आरोपी नंद किशोर मंगळवारी पहाटेच्या सुमारास पत्नी आणि मुलींच्या रुममध्ये रॉड घेऊन गेला. तसेच एकानंतर एक लोखंडी रॉडने त्या तिघींच्या डोक्यावर हल्ला सुरू केला. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर तिघींनी ओरडून मदत मागितली. आई आणि बहिणींचे आवाज ऐकूण मुलगा राहुल तेथे पोहोचला आणि त्याने वडिलांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या घटनेच्या पूर्वसंध्येलाच पती-पत्नीमध्ये आर्थिक चण-चण आणि मुलींच्या लग्नावरून वाद झाला होता.

Trending