आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Father Awarded Life Sentence For Raping Daughter And Nurse Given 7 Years Jail For Aborting

पोटच्या मुलीसोबत अत्याचार करणाऱ्या कलयुगी बापाला जन्मठेप; लालसेपोटी गर्भपात करणाऱ्या नर्सला 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सतना - पोटच्या मुलीसोबत कुकर्म करणाऱ्या दुराचारी बापाला उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने अवैधरित्या गोळ्या आणि इंजेक्शनने मुलीचा गर्भपात करणाऱ्या नर्सलाही 7 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 

 

माहितीनुसार, पीडिताच्या बापाने कोलगवा पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर 29 ऑक्टोबर 2019 रोजी पीडितेची मामी तिला घेऊऩ कोलगवा पोलिस ठाण्यात गेली. आरोपीने आपल्यासोबत विविध अत्याचार केल्याचे पीडितेने सांगितले. गर्भवती झाल्यानंतर आरोपी मुलीला घेऊन नर्सकडे घेऊन गेला होता. नर्सने तिला गोळी दिली. पण गर्भपात न झाल्यामुळे दुसरे इंजेक्शन देऊन गर्भपात केला.

 

नर्सला 7 वर्षाच्या कारावासाची शिक्षा 
पीडितेच्या विधानावरून सतना जिल्ह्यातील कोलगवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपींना अटक करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. कोर्टाने भा.दं.वि कलम 376, 313 आणि 201 अंतर्गत आरोपी बापाला जन्मठेपेसोबत 8 हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली. 


न्यायालयाने अवैधरित्या आणि लालसेपोटी अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी नर्सलाही दोषी मानले आहे. नर्स सपना संतोष पांडेय रा.हनुमान नगर, नवीन वस्ती हिला देखील भा.दं.वि कलम 313 आणि 201 अंतर्गत 7 वर्षाचा कारावास आणि 3 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.