आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राक्षसी : बापाने चिमुरड्या मुलाला बेदम मारले, चेहऱ्यासह संपूर्ण शरीर झाले काळे-निळे, बायोकालाही साखळीने बांधून मारले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाला सिटी - येते एका निर्दयी पित्याने त्यांच्या निरागस मुलाला दांड्याने बेदम मार दिला. तसेच पत्नीलाही साखळीने बांधून मारहाण केली. शेजाऱ्यांनी आरडाओरडा ऐकूण चाइल्ड लाइनमध्ये याबाबत माहिती दिली. बुधवारी सायंकाळी उशिरा चाइल्ड लाइनने मुलाचे मेडिकल चेकअप केले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. 


ही होती चूक.. 
पोलिस सध्या मुलाच्या पित्याचा शोध घेतल आहेत. चाइल्ड लाइन टीमला माहिती मिळाल्यानंतर ते कुराली गावात पोहोचले होते. त्याठिकाणी त्यांनी मुलगा अत्यंत रडत असल्याचे पाहिले. तर त्याची आई एका कोपऱ्यात साखळीने बांधलेल्या अवस्थेत होती. या मुलाच्या चेहऱ्यापासून संपूर्ण शरीरावर लाकडी दांड्याने मारहाण केल्याचे व्रण होते. मुलाने वडिलांच्या खिशातून 20 रुपये काढले होते, त्यामुळे वडिलांनी त्याला मारल्याचे समोर आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...