Home | Khabrein Jara Hat Ke | father became the partner of 18 years old girlfriend of his son

मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रेयसीचा पार्टनर बनला पिता, कारण जाणून व्हाल थक्क, सोशल मीडियावर होती आहे त्यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 13, 2019, 12:10 AM IST

मुलाच्या प्रेयसीची इच्छा पूर्ण करण्यासाठी पिता झाला तिचा पार्टनर

  • father became the partner of 18 years old girlfriend of his son


    अमेरिका : आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीपासून दूर जाण्याचे दुःख एखाद्या धक्कापेक्षा कमी नाही. अमेरिकेतील काइली सूडर्सचा प्रियकर कार्टन ब्राउनचा मृत्यू झाल्यावर तिच्यासोबत असेच काही घडले. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. पण एक दिवस एका कार दुर्घटनेत कार्टनचे निधन झाले. कार्टनच्या निधनाने काईलीला धक्का बसला होता. 18 वर्षीय काइली अनेक दिवस या धक्क्यातून सावरली नाही. अशावेळी काइलीच्या प्रियकराचे वडीलांना एक उपाय सुचला. कार्टनच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी काइलीला खूप साथ दिली आणि तिचे पार्टनर बनत तिची इच्छा पूर्ण केली.

    गेल्या वर्षीच्या मे महिन्यातील ही घटना आहे. काइली कित्येक दिवसांपासून शाळेत आयोजित केलेल्या प्रॉम पार्टीत जाण्यासाठी तयारी करत होती. पण यादरम्यान कार्टनचा मृत्यू झाला. यामुळे तिला मोठा धक्का बसला. यानंतर तिने या पार्टीत न जाण्याचा निर्णय घेतला. कार्टनच्या वडिलांना याबाबत समजताच ते भावुक झाले आणि त्यांनी आपल्या मुलाच्या प्रेयसीची इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय केला.

    यानंतर काइलीच्या प्रियकराचे पिता रॉबर्ट ब्राउन काइलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिचे पार्टनर बनून शाळेत गेले. आपल्या मुलाच्या प्रेयसीचा पार्टनर बनण्यासाठी रॉबर्ट यांनी शाळेच्या मुख्यध्यापकांकडून परवानगी मागितली होती.

    रॉबर्ट ब्राउनने काइलीचे पार्टनर बनून तिची इच्छा तर पूर्ण केली, पण सोबतच त्यांनी पार्टीमध्ये तिच्यासोबत डान्स देखील केला. याशिवाय त्यांनी आठवणी म्हणून अनेक फोटो देखील काढले. या घटनेनंतर कार्टन आणि काइली यांची प्रेम कहाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. अमेरिकेमध्ये प्रॉम पार्टीची प्रथा आहे. यामध्ये शाळेतील मुले एका ठिकाणी एकत्र येऊन आपल्या पार्टनरसोबत डान्स करतात आणि पार्टीचा आनंद घेतात.

Trending