आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉकिंग : डॉगी समजून घरी आणला हा प्राणी, चांगली मैत्रीही झाली परंतु...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एयू क्लेयर - अमेरिकेत एक व्यक्ती आपल्या 5 वर्षांच्या मुलींसाठी पाळीव प्राणी घेऊन आला. हा दिसायला हुबेहूब एखाद्या डॉगीप्रमाणे होता आणि संपूर्ण फॅमिलीसुद्धा याला डॉगी समजली. घरी आणलेल्या या डॉगीची तब्येत खूप खराब होती परंतु संपूर्ण फॅमिलीने याची काळजी घेऊन याला ठीक केले. या डॉगीचा फॅमिलीला विशेषतः लहान मुलीला खूप लळा लागला होता. हा डॉगी मोठा होऊ लागल्यानंतर फॅमिलीला त्याचे सत्य समजून आले. वास्तवामध्ये तो डॉगी नसून एक जंगली लांडगा होता, जो घरामध्ये पाळीव प्राण्याप्रमाणे राहत होता.


फॅमिली समजत होती डॉगी
- विस्कॉन्सिन स्टेटच्या एयू क्लेयर येथे राहणारे रिक हानेस्टेड यांना एके दिवशी ऑफिसमधून घरी येताना रस्त्यावर एक लहानसे पिल्लू दिसले, जे वाईट अवस्थेत पडलेले होते.
- त्यांनी हे पिल्लू घरी आणले. त्याचे नावही विल्ली ठेवण्यात आले. त्याची तब्येत खूप खराब होती आणि त्याला उपचाराची आवश्यकता होती.
- परंतु फॅमिलीला त्याचे खरे रूप माहिती नव्हते. ते त्याला डॉगीचे पिल्लू समजत होते आणि त्याची काळजीही घेत होते. काही दिवसांनी त्याची तब्येत चांगली झाली. 
- रिकी यांची 5 वर्षांची मुलगी हॅलीची विल्लीसोबत चांगली मैत्री झाली होती. हे दोघेही सोबत खेळायचे.
- विल्लीमध्ये पाळीव डॉगीपेक्षा एवढाच फरक होता की त्याने कच्चे मांस खाल्लेले नव्हते. तो नेहमी फ्राय केलेले अंडे आणि हरणाचे शिजवलेले मीट खात होता.
- तो एखाद्या सामान्य डॉगीप्रमाणे राहत होता आणि फॅमिलीसोबत फिरायलाही जायचा.


फॅमिलीला कळले विल्लीचे सत्य
- विल्ली जसाजसा मोठा होत गेला त्याप्रमाणे फॅमिलीला त्याचे सत्य समजू लागले. त्यांच्या लक्षात आले की, हा एखादा डॉगी नसून एक लांडगा आहे.
- परंतु विल्लीविषयी या फॅमिलीचे प्रेम कमी झाले नाही. तो मोठा झाल्यानंतर या फॅमिलीने त्याच्यासाठी घराबाहेर एक छोटेसे घर बनवले.
- जंगली आणि हिंस्र प्राणी असूनही विल्लीने कधीही कोणावर हल्ला केला नाही आणि फॅमिलीला तेच प्रेम दिले, जे त्याला त्यांच्याकडून मिळाले होते.

बातम्या आणखी आहेत...