आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Father Calls Daughter, Her Husband For Talks After Their Inter Caste Marriage, Hacks Them With Machete

Shocking VIDEO: आंतरजातीय विवाहानंतर वडिलांनी बहाण्याने बोलावले; मुलगी, जावयावर कोयत्याने केले वार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - येथे राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणी आणि तिच्या पतीवर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यातच या तरुणीने आपल्या प्रियकरासोबत आंतर-जातीय विवाह केला होता. कुटुंबियांचा या विवाहाला विरोध असल्याने त्यांनी संपर्क तोडले होते. यानंतर मुलीच्या वडिलांनी बुधवारी अचानक तिला फोन करून आपला काही आक्षेप नसून एकदा भेटायला ये असे सांगितले. वडिलांच्या एका फोनवर तरुणी इतकी खुश झाली की काहीच विचार न करता ती थेट आपल्या पतीला घेऊन वडिलांची भेट घेण्यासाठी पोहोचली. ही तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली.


बुधवारीच केला विवाह
माधवी 20 आणि संदीप 21 हैदराबादच्या एकाच महाविद्यालयात शिकत होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात प्रेम जुळले होते. परंतु, माधवी उच्चवर्णीय आणि संदीप दलित असल्याने आपले कुटुंबीय कधीच होकार देणार नाहीत याची जाणीव दोघांना होती. तरीही गेल्या आठवड्यात बुधवारी (12 सप्टेंबर रोजी) दोघांनी मित्र-मैत्रिणी आणि पोलिसांच्या साक्षीने आर्य समाजाच्या रितीनुसार विवाह केला. यानंतर हैदराबादच्या एसआर नगर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दोघांच्या कुटुंबियांना बोलावून घेतले. माधवी आणि संदीपच्या कुटुंबियांना त्यांच्या विवाहाची माहिती देऊन समेट घडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, माधवीचे वडील काहीही न बोलता तेथून निघून गेले. 


पाहताक्षणी केला कोयत्याने वार
> आपल्या कुटुंबियांनी संपर्क तोडल्याच्या दुखात असलेली माधवी रोज वडिलांच्या फोनची वाट पाहायची. आठवडाभर आई-वडिलांपासून दूर राहिल्यानंतर अखेर बुधवारी (19 सप्टेंबर रोजी) तिला वडिल मनोहराचारी यांनी फोन केला. फोनवर बोलताना आपला लग्नास आक्षेप नसून एकदा पतीला घेऊन चर्चेसाठी ये असे त्याने माधवीला सांगितले. माधवी वडिलांच्या फोनवर इतकी खुश होती, की तिने काहीच विचार केला नाही. वडिलांनी सांगितलेल्या पत्त्यावर थेट आपल्या पतीला घेऊन ती पोहोचली. घटनास्थळी मनोहराचारी आधीच बाइक घेऊन उपस्थित होता.
> मुलगी आणि जावयाला पाहताक्षणी मनोहराचारीने बाइकचा स्टॅन्ड लावला. हेलमेट काढून बॅगेत आणलेला धारदार कोयता बाहेर काढला आणि अचानक संदीपच्या दिशेने धाव घेत सपा-सप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यात संदीप जागीच कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत असलेला संदीप काहीच हालचाल करू शकला नाही. जबरदस्त धक्क्यात असताना माधवीने आपल्या पतीला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पित्याने माधवीच्या गळ्यावर आणि खांद्यावर कोयत्याने वार केले. रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला थांबवू शकला नाही. लोक गर्दी करत असल्याचे पाहता आरोपी मोहनाचारी घटनास्थळावरून पसार झाला. 


संदीप, माधवी दोघेही गंभीर...
गंभीर जखमी अवस्थेत संदीप आणि माधवीला लोकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील माधवीला अतीरक्तस्राव झाल्याने आयसीयूत ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांनी तिच्या गळ्यावर कोयत्याने गंभीर वार असल्याने प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...