आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्यासह पित्याची रेल्वेखाली आत्महत्या; घरगुती वादातून घडलेला प्रकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - पत्नीसोबत झालेल्या किरकोळ वादातून पतीने सहा वर्षीय चिमुकल्यासह रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. जालना शहरापासून जवळच असलेल्या शिरसवाडी शिवारात शनिवारी सकाळी हा प्रकार घडला. सय्यद अनिस सुलतान (३०, रेवलगाव, ता. परतूर) असे मृताचे नाव असून त्याचा सहा वर्षांचा मुलगा सय्यद अर्शान याचाही मृत्यू झाला.  सय्यद अनिस पुतण्याच्या लग्नासाठी जालन्यात आला होता.

तीन दिवसांपूर्वी अनिस याच्या पुतण्याचे परभणीत लग्न झाले. त्यानंतर बरेच पाहुणे आनंदनगर येथे थांबले होते. पत्नी सोबत नव्हती. दरम्यान, सय्यद अनिस शनिवारी सकाळी आपला सहा वर्षीय मुलगा अर्शान याला घेऊन घराबाहेर पडला. त्यानंतर ८.३० च्या सुमारास टीव्ही सेंटर भागात त्याने औरंगाबादकडून जालनाकडे जाणाऱ्या रेल्वेखाली उडी मारून मुलासह आत्महत्या केली. मृत सय्यद अनिस याचा काही दिवसांपासून पत्नीसोबत वाद होता.