Home | International | Other Country | Father Confesses Raping Son For Five Years Police Found Video On website

5 वर्षांपासून जन्मदाता बापच करत होता मुलाचा रेप, आईला काही कळलंच नाही, मग एका दिवशी..

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 20, 2018, 12:26 PM IST

शियात एका बापाचा भयंकर प्रकार समोर आला आहे. तो मागच्या 5 वर्षांपासून स्वत:च्या मुलाचे लैंगिक शोषण करत होता.

 • Father Confesses Raping Son For Five Years Police Found Video On website

  मॉस्को - रशियात एका बापाचा भयंकर प्रकार समोर आला आहे. तो मागच्या 5 वर्षांपासून स्वत:च्या मुलाचे लैंगिक शोषण करत होता. एवढेच नाही, तर तो मुलाच्या रेपचे घाणेरडे व्हिडिओ आणि फोटोजही इंटरनेटवर शेअर करत होता. दुसरीकडे, मुलाची आईसुद्धा या सर्वांपासून अनभिज्ञ होती. आरोपी बापाच्या एका व्हिडिओने एका व्हिडिओने त्याचे सर्व रहस्य समोर आणले. या व्हिडिओ त्याचा आणि मुलाचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे.

  असा लावला पोलिसांनी छडा
  - पोलिसांनी सांगितले की, टीम एका एनक्रिप्टेड वेबसाइटची तपासणी करत होती, तेव्हा त्यांना पिडोफिल्स (लहान मुलांकडे सेक्शुअली आकर्षिक होणारे प्रौढ) अश्लील व्हिडिओज आणि फोटोज दिसले.
  - यादरम्यान, पोलिसांची नजर अशाच एका व्हिडिओवर गेली, ज्यात आरोपी आणि मुलाचा चेहरा स्पष्ट दिसत होता. त्यांनी लॉ इन्फोर्समेंट सोर्सला याची माहिती दिली.
  - यानंतर त्या आरोपीचा दुसरा व्हिडिओ हाती लागला, त्या माध्यमातून पोलिसांना आरोपीचा आयपी अॅड्रेस ट्रेस करण्यात मदत मिळाली. या आधारे पोलिसांना मॉस्कोच्या त्याच्या घराचा पत्ता मिळाला.
  - या आठवड्यात पोलिसांनी आरोपीच्या घरी धाड टाकली. जेथे तो आपली पत्नी आणि मुलासोबत राहत होता. पोलिसांनी सांगितले की, चौकशी केल्यावर आरोपीने आपले सर्व गुन्हे कबूल केले.

  मित्र आणि कुटुंबालाही बसत नाहीये विश्वास
  - हे प्रकरण समोर आल्यानंतर आरोपीची पत्नी तसेच मुलाच्या आईला धक्का बसला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांना अंदाजच नव्हता की, त्यांचे मुलाचे त्यांच्याच घरात याप्रकारे शोषण होत आहे.
  - दुसरीकडे, आरोपीच्या मित्रांचे म्हणणे आहे की, तो आपल्या मुलावर खूप प्रेम करणारा बाप होता आणि नेहमी आपल्या फॅमिली हॉलिडे, बर्थडे आणि स्कूल इव्हेंटचे फोटोज शेअर करायचा. यामुळे असे आरोप खूपच धक्कादायक आहेत.

Trending