आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबरेली (उत्तरप्रदेश) - बरेली येथे आश्चर्यचकित करणारी एक घटना समोर आली आहे. येथील एक पिता आपल्या मृत नवजात मुलीला दफन करण्यासाठी शहरातील स्मशानभूमीत गेला. तेथे दफन करण्यासाठी खड्डा खोदतेवेळी तीन फूट खोल एका मातीच्या मडक्यात जिवंत नवजात मुलगी आढळली. त्या व्यक्तीने याला दैवी चमत्कार मानत त्या मुलीचा स्वीकार केला. मात्र त्या नवजात मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. तिला रुग्णालयातील आयसीयूत दाखल करण्यात आले आहे.
असा आहे घटनाक्रम
सीबीगंज स्थित वेस्टर्न कॉलनी येथील रहिवासी हितेश कुमार सिरोहीची पत्नी वैशाली पोलिस खात्यात नोकरीला आहे. गेल्या शुक्रवारी वैशालीने एका मुलीला गरोदरपणाची नऊ महिने पूर्ण होण्यापूर्वीच जन्म दिला. मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. हितेशने मुलीला दफन करण्यासाठी परिसरातील दफनभूमीत गेले. येथे खड्डा खोदताना तीन फूट खोल अंतरावर एक मातीचे मडके सापडले. माती बाजुला काढून पाहिले मडक्यात जिवंत नवजात मुलगी होती. हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले.
पोलिसांना दिली माहिती
हितेशने तात्काळ मुलीला मडक्यातून बाहेर काढले. मुलगी रडत होती. तिच्यासाठी दुधाची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान हितेशने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला रुग्णालयात दाखल केले. यानंतर हितेशने आपल्या मृत मुलीला दफन केले. दरम्यान त्या मुलीला कोण येथे सोडून गेले याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मुलीचे 'सीता' असे नामकरण केले आहे.
स्वतःच्या मुलीसोबत नातेसंबंध तोडणाऱ्या आमदाराने स्वीकारले मुलीची जबाबदारी
बिथरीचे भाजप आमदार राजेश मिश्रा यांनी मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षीने आपल्या पित्याच्या् विरोधात जाऊन स्वखुशीने दलित तरुणासोबत लग्न केले होते. यानंतर आमदार मिश्रा यांनी साक्षीसोबतचे सर्व नातेसंबंध तोडले होते. आता त्यांनीच या नवजात मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.