आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Father Has Been Abusing Daughter For Past 3 Years Daily In Indore Madhya Pradesh

तीन बर्षांपासून बाप मुलीवर करायचा बलात्कार, ती कॉलेजलला गेल्यावर फोन करून म्हणायचा- लवकर घरी ये, मला तुझ्याशिवाय करमत नाही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदुर(मध्यप्रदेश)- मेडिकल कॉलेजमध्ये फिजिओथेरेपीचे शिक्षण घेत असलेल्या मुलीवर तिचे वडील तीन वर्षांपासून बलात्कार करायचा. शिक्षण बंद करेल किंवा आईला जीवे मारेल अशी झमकी देऊन करायचा आत्याचार. शुक्रवारी मुलीने आपल्या मैत्रिणीसोबत पोलिस ठाणे गाठून वडिलांविरूद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी 38 वर्षीय आरोपी वडिलांना अटक केले आहे. मुलीने तक्रारीत सांगितले की, वडील शिक्षण बंद करेल किंवा आईला जीवे मारेल अशी धमकी देऊन वाईट कृत्य करायचे. या वर्षी मी हॉस्टेलला जाईल आणि माझी छोठी बहिण घरी येईल, नंतर ते तिच्यासोबतही तेच करतील. त्यामुळेच मी त्यांच्या विरोधात तक्रार केली. कॉलेजमध्ये मी निर्भया प्रकरणावर लेक्चर ऐकले आणि त्यानंतर मी माझ्या मैत्रिणींना सुरू असलेला सगळ्या प्रकार सांगितला. त्यानंतर पुरावे गोळा करून मी शुक्रवारी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीत.


मुलीची आई म्हणाली घरातील प्रकरण घरीच मिटवले असते तर बरे झाले असते
पोलिसांना संशय आहे की, मुलीच्या आईला या सगळ्या प्रकाराची आधीपासूनच माहिती होती. एके दिवशी मुलगी आपल्या आईला म्हणाली होती की, तिची एक मैत्रिण आहे, जिचे वडील तिच्यावर बलात्कार करतात. त्या मुलीने काय करायला हवे ? तेव्हा आई म्हणाली होती- मुली वडीलच घर चालवतात त्यामुळे त्या मुलीने काहीच न करता घरातील प्रकरण घरातच मिटवले पाहिजे. पोलिसांना संशय आहे की, वडिलांच्या 17 हजार रूपये पगाराच्या हव्यासापोटी मुलीच्या आईने काही पाउल उचलले नाही.

बातम्या आणखी आहेत...