आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती नामर्द निघाला, म्हणून सासरा अन् दिरानेच घातला अब्रूवर घाला, म्हणाले- वंश पुढे न्यायचाय, तुला ऐकावेच लागेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुनेवर सासरा व दिराने मिळून बलात्काराचा प्रयत्न केला. - Divya Marathi
सुनेवर सासरा व दिराने मिळून बलात्काराचा प्रयत्न केला.

अहमदाबाद - नुकतीच लग्न होऊन सासरी नांदायला आलेली मुलगी मोठ्या अपेक्षेने घरात वावरत असते. ती निर्धास्त असते आपल्या सग्यासोयऱ्यांमध्ये संरक्षण आहे म्हणून. परंतु कधी-कधी हेच कुंपण शेत खायला उठते. पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना नवीन नाहीत, अशीच एक घटना अहमदाबादेतील सरदारनगरमध्ये एप्रिल महिन्यात उजेडात आली होती. येथे पोलिस स्टेशनमध्ये एका सुनेने आपल्या सासऱ्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केली. पीडिता म्हणाली की, पती नामर्द आहे. यामुळे वंश पुढे नेण्यासाठी सासरा व दीर माझ्यावर संबंध बनवण्यासाठी दबाव टाकत आहेत. माझ्या सासूसोबत मिळून सासरा व दीर माझ्यावर अत्याचार करत आहेत. दुसरीकडे, पतीला सांगितल्यावर तो बदनामी होईल म्हणून गप्प राहा म्हणतो, स्वत:च आत्महत्येची धमकी देतो.

 

अनेकदा केली बळजबरी... 
सुनेने आरोप केला की, लग्नाच्या 4 वर्षांनंतरही त्यांना काही अपत्य न झाल्याने सासऱ्याने बलात्काराचा प्रयत्न केला. सासरा व दीर दोघांनी मिळून बळजबरी करत झटापटीत माझ्या हाताचे एक बोटही कापले. एकदा तर दीर व सासरा शेजाऱ्याला घेऊनच माझ्या रूममध्ये घुसले होते. सगळे जण माझे हात-पाय बांधून जबरदस्ती करत होते. त्यांनी माझे केसही कापले. या कामात माझी सासूही त्यांना साथ देत होती. सासू मला किन्नर म्हणते. आता ते माझ्या आईला जिवे मारण्याची धमकी देत आहेत. पतीला सांगितले, तर तो बदनामी होईल म्हणून गप्प राहा म्हणतो, आत्महत्या करण्याची धमकी देतो. मी काय करू काहीच कळत नाही. सततचे हे अत्याचार सहन न होऊन अखेर मी पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केला.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या संतापजनक घटनेचे आणखी फोटोज... 

 

 

बातम्या आणखी आहेत...