आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPS सुसाइड केस : दास यांनी पत्नी रवीनाला शेवटच्या ईमेलमध्ये लिहिले होते, माझ्यासारखे लोक प्रेम करण्याच्या लायकीचे नाहीत..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - दिवंगत IPS सुरेंद्र दास यांचे सासरे डॉ. रावेंद्र सिंह यांनी त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप करत आत्महत्येचे कारण कौटुंबीक तणाव असल्याचे म्हटले आहे. त्यांनी काही कॉल रेकॉर्डिंग्स आणि मुलगी रवीनाला सुरेंद्रने पाठवलेला अखेरचा ई-मेल जारी केला आहे. त्यानुसार कुटुंबीयांकडून त्यांना अपेक्षित प्रेम मिळाले नसल्याचे म्हटले आहे. मुलगी रवीना आणि दास यांच्या नात्यात दुरावा निर्माण होण्यामागेही सुरेंद्र यांची आई इंदुवती, मोठा भाऊ नरेंद्र आणि त्याच्या पत्नीला समावेश आहे. आयपीएस सुरेंद्र दास यांनी 5 सप्टेंबरला सुसाइड केले होते. चार दिवसांनंतर रुगणालयात त्यांचा मृत्यू झाला होता. 


काय आहे, पत्नीला पाठवलेल्या अखेरच्या ई मेलमध्ये.. 
- सासरे डॉ. रावेंद्र यांच्या मते, 22 जुलैला सुरेंद्र यांनी रवीनाला एक ई-मेल केला होता. त्यात त्यांनी कौटुंबीक तणावामुळे जीव देण्याबाबत लिहिले होते. 
- ई-मेल मध्ये लिहिले आहे, आपल्यामध्ये वारंवार जे घडतेय, ते विनाकारण घडत नाही. प्रत्येत गोष्टीमागे कारण असते. यामागेही कारण आहे. 
- खूप विचार केल्यानंतर मला लक्षात आले की, प्रेम कसे करायचे हेच मला माहिती नाही. ते कसे व्यक्त करायचे असते किंवा दाखवायचे असते हेही कळत नाही.  मुझे पता ही नहीं कि प्यार कैसे करना है। इसे कैसे दिखाना या बताना है। और मैं डिजर्व भी नहीं करता।'
- कदाचित यामुळेच घरात सर्वात लहान असून आणि सर्वांसाठी सर्वकाही करूनही मला त्यांच्याकडून ते प्रेम, सहकार्य आणि काळजी मिळाली नाही. कारण माझ्यासारखे लोक प्रेमासाठी नसतातच. 
- तू माझ्या जीवनात आली. प्रेम, काळजी सर्वकाही तु दिले. पण तरीही अडचणी कायम राहिल्या. मला फक्त एक कारण जाणवते, माझ्यासारखे लोक प्रेमासाठी बनलेलेच नसतात. कुटुंब असो की पत्नी मी आता कोणतेही नाते टिकवू शकत नाही. 
- माझ्यासारखे लोक फक्त इतरांचे जीवन उध्वस्त करू शकतात. तुझे नशीब खराब म्हणून तू माझ्या जीवनात आलीस. माझ्यासारखे लोक या जगात राहण्याच्या लायकीचे नाहीत. 
- आयपीएस अधिकाऱ्यांनी पुढे लिहिले, मी यशस्वी होऊ शकतो. पण इतरांना आनंद देऊ शकत नाही. कोणाचे दुःख वाटून घेऊ शकत नाही. माझ्यासारखे लोक फक्त स्वार्थी असू शकतात. कोणाला काही देऊ शकत नाहीत, हेच सत्य आहे. 


देवाकडे प्रार्थना माझे जीवन संपवावे 
- या ई मेलमधून दास यांचे दुःख स्पष्ट जाणवते. ते पुढे लिहितात, तरीही मी तुझ्यावर प्रेम करतो. पण मला वाटते हा एक भास आहे. अनेक प्रयत्नांनंतरही मी स्वतःला संपवण्यास सक्षम नाही. देवाला प्रार्थना आहे की माझे जीवन संपवावे. 
- जर मी कधी जीवन त्यागले तर तु आनंदी राहा. ही घटना सकारात्मकपणे घे. एखाद्या चांगल्या व्यक्तीशी लग्न करून आंदी राहा. 


सुरेंद्र दास यांच्या सासऱ्यांचे आरोप.. 
- सुरेंद्र यांच्या सासऱ्यांच्या मते, सुरेंद्र यांचे कुटुंब त्यांना पैसे कमावण्याची मशीन समजत होते. त्यांनी सुरेंद्रचे अेक कॉल रेकॉर्डींगही जारी केली. 
- सुरेंद्रनेच रवीनाला हे कॉल रेकॉर्डींग दिल्याचे सासरे म्हणाले. या रेकॉर्डींगमध्ये दावा करण्यात आला आहे की, कुटुंबातील लोक नेहमी सुरेंद्रकडे पैशाची मागणी करायचे. त्यामुळे ते तणावात होते. 
- ते म्हणाले की, रवीनापूर्वी सुरेंद्रचे लग्न मोनिका नावाच्या मुलीशी ठरले होते. काही विधीही झाले होते. पण मोठा भाऊ नरेंद्र, वहिणी नेहा आणि आई इंदुवती यांच्या दबावामुळे ते नाते तुटले. पण मोनिकाकडून देण्यात आलेली रक्कम आणि भेटवस्तू नरेंद्रने ठेवून घेतल्या होत्या. मागूनही परत दिल्या नाही. 
- रविनाचे लग्न मॅट्रिमोनियल वेबसाईटद्वारे ठरले होते. सुरेंद्रला रविना आवडली होती. पण घरचे लोक तयार नव्हते. पण नंतर सुरेंद्रने नंतर त्या सर्वांना तयार केले. त्यानंतर मोठा भाऊ आणि वहिणीच्या मर्जी विरोधात 9 एप्रिल 2017 ला लखनऊच्या एका हॉटेलमध्ये लग्न झाले. 
- सासरे म्हणाले की, सुरेंद्रच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी त्याला काहीही मदत केली नव्हती. उलट रवीना गिफ्ट करण्यासाठी सुरेंद्रनेच भावाला गिफ्ट खरेदी करून दिले होते. त्याचे रेकॉर्डींगही त्यांच्याकडे आहे. 

बातम्या आणखी आहेत...