Home | National | Madhya Pradesh | Father in law rape his wife; The husband was looking silently instead of saving his wife

जेवन वाढ म्हणत किचनमध्ये घुसला सासरा, तोंड दाबून केला सुनेवर बलात्कार; शांतपणे पाहत होता पती, उलट पत्नीलाच धमकावले

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 11, 2018, 12:05 AM IST

पतीने तिला वाचवणे सोडून कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

  • Father in law rape his wife; The husband was looking silently instead of saving his wife

    देवास- मध्य प्रदेशातील देवासमध्ये एका महिलेवर तिच्या सासऱ्याने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. महिलेचा सासरा बळजबरी करत असताना पती तिच्यासमोर उभा असून सर्व शांतपणे पाहत असल्याचे तिने सांगितले. महिलेने दोघांविरोधात कांटाफोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोघांना स्थानिक न्यायालयात हजर करत त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले.

    वडील पत्नीवर बलात्कार करत होते आणि मुलगा शांतपणे पाहत होता

    > घटना घडल्याच्या रात्री महिला किचनमध्ये असताना तिला सासऱ्याने जेवन वाढायला सांगितले. किचनमध्ये जाऊन सासऱ्याने अचानक महिलेचे तोंड दाबले आणि तिच्यावर बळजबरी करत बलात्कार केला. वडील पत्नीवर बलात्कार करत असताना मुलगा शांतपणे उभा राहून सर्व पाहत होता. महिला आपली आब्रु वाचावी म्हणून दोघांसमोर दयेची भीक मागत होती. परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. उलट याबद्दल बाहेर कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देत पतीने महिलेला धमकावले. घटनेनंतर त्या दोघांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. महिलेने या सर्व घटनेची माहिती तिच्या आईला आणि भावाला सांगितल्यानंतर तिच्या घरच्यांनी पती आणि सासऱ्याविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत दोघा बापलेकांना अटक केली आहे.

Trending