आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीच्या वादातून बापाने केला मुलाचा खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली  - शेतीच्या वादातून जन्मदात्या बापानेच ३२ वर्षीय मुलाचा डोक्यात वखराच्या रुमण्याने वार करून खून केल्याची घटना वसमत तालुक्यातील गुंडा येथे घडली. याबाबत हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 


याबाबत हट्टा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गुंडा येथील उद्धव सखाराम खिल्लारे (३२) हा त्याच्या शेतात गेला होता. त्याच वेळी त्याचा बाप सखाराम हासुद्धा त्याच्या मागे मागे शेतात गेला. शेतात गेल्यावर शेतातील कडबा नेण्याच्या आणि शेतीची वाटणी करण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. 


या घटनेत ६० वर्षीय  बापाने ३२ वर्षीय मुलाच्या डोक्यावर वखराच्या रुमण्याने वार केले. त्यामध्ये गंभीर जखमी झालेला उद्धव खिल्लारे  याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत हट्टा पोलिसांना माहिती कळल्यानंतर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गुलाब बाचेवाड,  फौजदार डी. एन.  मुलगीर व  पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पंचनामा केला.  त्यानंतर वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात मृताचे शवविच्छेदन करून आरोपी बापावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि बाचेवाड हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...