आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
करमाड- शाळेत का जात नाहीस म्हणत जन्मदात्या पित्याने पोटच्या मुलास जिवंत मारले. ही घटना घडल्यानंतर मुलाचा बाप फरार असून करमाडचे (ता. औरंगाबाद) पोलिस त्याच्या मागावर आहेत. ही घटना जळगाव फेरण येथे घडली.
आरोपी प्रभूसिंग विठ्ठलसिंग बैनाडे (रा. फेरण जळगाव ता. औरंगाबाद) हा दरेगाव रस्त्यावरील शेतात कुटुंबासह राहतो. आरोपी प्रभूसिंग यास पत्नी रेणुका बैनाडे व रवी (१३), अजय प्रभूसिंग बैनाडे (११) व काजल प्रभूसिंग बैनाडे (८) अशी तीन अपत्ये आहेत. मोठा मुलगा रवी हा गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीत शिकतो. तो एक-दोन दिवस शाळेत गेला नव्हता. म्हणून ३१ डिसेेंबरला घरातून निघून गेला हाेता. शाळेतील शिक्षक कांबळे यांनी रवीला शोधून शाळेत आणले व तशी कल्पना त्याची आई रेणुकाला दिली. शाळा सुटल्यानंतर बुधवारी (दि. २) रवी ३ वाजेच्या दरम्यान घरी आला. त्यावेळी सर्व जण घरीच होते. रवीला पाहताच आरोपी बापाने लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. लाकडी दांडा तुटल्यावर नराधम बापाने लोखंडी सळईने रवीच्या डोक्यावर, पोटावर, हातावर, पायावर जबर मारहाण केली. सर्वस्व हरपल्याची भावना होताच रेणुका या मोठमोठ्याने रडू लागल्या. रडण्याच्या आवाजाने आसपासचे लोक जमा झाले. असता आरोपी प्रभूसिंग बैनाडे पळून गेला. बेशुद्ध अवस्थेतील रवी यास उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले, असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.