आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्डर : मुलाला पहाटेच अभ्यासाठी उठवले, मुलाने शिवी दिली म्हणून पित्याने रागात रायफलने घातल्या गोळ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - मुलाच्या अभ्यास आणि भविष्यासाठी दबाव टाकणे आणि जास्त चिंता करणे त्याच्यासाठी जीवघेणी ठरू शकते. रांचीमध्ये सोमवारी अशीच एक घटना घडली. एका पित्याने स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मुलगा राहुल रावत (29) ला पहाटे अभ्यासासाठी उठवले. त्यावेळी मुलाने वाद घातला. संतापाच्या भरात पित्याला मुलाने शिवी दिली. त्यानंतर पित्याचा रागही अनावर झाला. पित्याने त्यांच्या लायसन्स रायफलद्वारे गोळी घालून मुलाची हत्या केली. आरोपी राकेश रावत (58) अटकेत असून मृत राहुल रावत (29) चा मृतदेह पोस्टमॉर्टर्मसाठी पाठवण्यात आला आहे. 


आरोपी म्हणाला, माझ्या रागामुळे पत्नीही सोबत राहत नाही 
राकेश रावत 2005 मध्ये सीआरपीएफमध्ये हवालदार पदावरून झाला आहे. टिकली टोली येथील घरी तो मुलासह राहत होता. चौकशीत त्यांनी सांगितले की, त्यांचा आणखी एक मुलगा दिल्लीत राहतो तर मुलगी धुर्वामध्ये शिक्षण घेत आहे. राकेशने म्हटले की, त्यांना प्रचंड राग येतो त्यामुळे पत्नीशीही वाद होतात आणि म्हणून त्यांची पत्नी माहेरीच राहते. 


मी अभ्यास करायला सांगायचो, तो ऐकतच नव्हता 
राकेश रावत यांनी सांगितले की, मी 25 वर्षे नोकरी केली. मुलाला चांगली नोकरी लागावी असे मला वाटत होते. मी राहुलला नेहमी म्हणायचो की, सकाळी लवकर उठून अभ्यास करायला हवा. पण तो ऐकतच नव्हता, 11 वाजेपर्यंत झोपलेला असायचा. सोमवारी सकाळी 6:20 वाजता मी त्याला झोपेतून उठवले आणि अभ्यास करायला सांगितले. तो नाराज झाला आणि आमच्यात वाद सुरू झाला. राहुल मला घाणेरड्या शिव्या देत होता. त्याने मला शिव्या दिल्याने मी संतापलो. रायफल घेतली आणि त्याला गोळी घातली. गोळी त्याच्या डाव्या खांद्याच्या खाली लागली आणि तो पडला. गोळी चालवल्यानंतर मला पश्चात्ताप होऊ लागला. तो मरून जाईल असे वाटल्याने मी 108 डायल करून अॅम्ब्युलन्स बोलावली. अॅम्ब्युलन्स आल्यानंतर राहुलचा मृत्यू झाल्याचे समजले. 

 

बातम्या आणखी आहेत...