आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्याला काळीमा फासणारी घटना; विम्याची रक्कम मिळवण्यासाठी बापानेच आवळला चिमुकलीचा गळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काठमांडू- नेपाळच्या राजधानीत निर्दयी बापाला अटक करण्यात आली आह, ज्याने 25 लाख रुपयांसाठी आपल्या अल्पवयीन मुलीची गळा आवळून हत्या केली. पोलिस प्रवक्ते नबीन कर्कीने सांगितले की, सिराहा जिल्ह्यातील नगरपालिकेच्या परिसरात असलेल्या मौलापुरमध्ये राम किशोर यादव(39)ने सोमवारी आपली चार वर्षीय चिमुकली लक्ष्मीचा गळा आवळून खून केला. मुलीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी तलावात आढळला.


पोलिसांनी सांगितल्यानुसार राम किशोरच्या सगळ्यात लहान मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी प्रभु बँकतुन 25 लाख रूपयांचा विमा केला होता. पोलिसांच्या तपासात समोर आले की, त्याने 1,75,000 रूपये प्रीमियम भरला होता. त्याला कुठूनतरी कळाले की, जर विमाधारकाचा पॉलिसी घेतल्याच्या एका महिन्यात मृत्यू झाला, तर दुप्पट रक्कम मिळते. त्यानंतर त्याने आपल्या मुलीची हत्या करण्याचे ठरवले. सध्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...