Home | Khabrein Jara Hat Ke | Police have found the body of missing 8 month old King Jay Davila after his father took investigators to an open field near his neighborhood.

वडिलांसोबत गेला होता 8 महिन्यांचा मुलगा, तेव्हाच कुणीतरी केले अपहरण, काही तासांनंतर मिळाला मुलाचा मृतदेह 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 14, 2019, 10:43 AM IST

विचारपूसनंतर समोर आले भयावह सत्य, प्रकरणाला मिळाले वेगळे वळण

 • Police have found the body of missing 8 month old King Jay Davila after his father took investigators to an open field near his neighborhood.

  सेन एंटोनियो. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका मुलाचे अपहरण झाल्याच्या काही तासांनंतर त्याचा मृतदेह मिळाला. ही घटना घडली तेव्हा तो मुलगा वडिलांसोबत कारमध्ये बसलेला होता. यादरम्यान काही आरोपी कारमधून या मुलाला घेऊन गेले. यानंतर पोलिसांनी मुलाला शोधण्यासाठी सर्चिंग अभियान सुरु केले. पण नंतर या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले. खरेतर मुलाचे अपहरण झाले नव्हते, तर त्याचा मर्डर झाला होता. बाळाच्या मर्डरचा आरोप त्याच्या वडिलांवर होता.


  वडिलांच्या हाताने झाला मुलाचा मृत्यू...

 • Police have found the body of missing 8 month old King Jay Davila after his father took investigators to an open field near his neighborhood.

  - ही स्टोरी टेक्सासच्या सेन एंटोनियो शहरात राहणा-या क्रिस्टोफर डेविला आणि त्याच्या 8 महिन्यांच्या मुलाची आहे. 11 जानेवारीला क्रिस्टोफर पोलिसांजवळ पोहोचला आणि त्यांनी सांगितले की, तो त्याची कार घेऊन गॅस स्टेशन येथे गेला होता, तिथून त्याच्या मुलाला कुणीतरी किडनॅप केले. आरोपी त्याची कारही घेऊन गेला असे त्याने सांगितले. 
  - यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. सर्चिंग अभियानात जे सत्य समोर आले ते पाहून सर्वच हैराण होते. काही वेळानंतर स्वतः मुलाचा बाप पोलिसांनी अशा ठिकाणी घेऊन गेला, जिथे मुलाची डेडबॉडी मातीत दफन करण्यात आली होती. 
  - मुलाची बॉडी एका काळ्या रंगाच्या बॅकपॅकमध्ये बंद करुन जमीनीत कब्र बनवून दफन करण्यात आली होता. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी मुलाच्या कुटूंबियांना किडनॅपिंगविषयी विचारण्यास सुरुवात केली. 
  - घरातील लोकांनी विचारपूस करताना सहयोग दर्शवला नाही तेव्हा पोलिसांना संशय आला. यानंतर त्यांचे जबाब या घटनेशी जुळत नव्हते तेव्हा पोलिसांचा संशय जास्तच वाढला. यानंतर पोलिसांनी मुलाच्या वडिलांची कठोर चौकशी केली, यानंतर त्याने सर्व सत्य सांगितले. 


   

 • Police have found the body of missing 8 month old King Jay Davila after his father took investigators to an open field near his neighborhood.

  - डेविला पहिले मुलाला जिथे दफन करण्यात आले होते तिथे घेऊन गेला. यानंतर त्याने सांगितले की, मुलाचा मृत्यू घरातच झाला होता. खरेतर जेव्हा वडील मुलासोबत खेळत होते, तेव्हा मुलगा हातातून निसटला आणि त्याचे डोके ड्रेसिंग टेबलवर आदळले. 
  - ड्रेसिंग टेबलवर मुलाचे डोके आदळल्यानंतर तो मुलगा डोक्यावर पडला. यादरम्यान त्याच्या डोक्यात मोठी गाठ आली. थोड्या वेळानंतर त्याचा मृत्यू झाला. 
  - यानंतर घाबरलेल्या कुटूंबाने मुलाला हॉस्पिटलमध्ये किंवा पोलिसांकडे घेऊन जाण्याऐवजी त्याला एका सुनसान ठिकाणी दफन करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच डेविडने मुलाच्या अपहरणाची खोटी कहाणी बनवली. 
  - या परिसरातील फुटेज पाहून पोलिसांना अंदाज आला होता की, किडनॅपिंग घरातील लोकांनीच केली आहे. या प्रकरणात साथ दिल्यामुळे पोलिसांनी डेव्हिलाची आई सांपायो (65) आणि त्याची कजिन एंगी टोरेस (45) ला अटक केली. 

   

Trending