आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचानक घरी परतली पत्नी, विवस्त्र होता पती; मग मुलींनी सांगितली काळजाचा थरकाप उडवणारी हकिगत!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - पतीच्या राक्षसीपणामुळे त्रस्त होऊन उज्जैनहून मुलांसोबत पळून आलेल्या एका महिलेने पोलिसांत पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तिचा आरोप आहे की, पती आपल्या मुलांसोबत अश्लील कृत्य करतो. त्रस्त होऊन 7 वर्षीय मुलीला तिने माहेरात पाठवले होते, परंतु यानंतर तो जिवे मारण्याची धमकी देऊ लागला.

 

अचानक घरी परतली पत्नी, तेव्हा पती होता विवस्त्र
उज्जैनच्या जिवाजीगंजमध्ये राहणारी 30 वर्षीय महिला बुधवारी दुपारी बहिणीसोबत पोलिस स्टेशनमध्ये आली. तिने सांगितले की, साहेब! 40 वर्षांचा माझा पती आपल्याच पोटच्या मुलींवर रेप करतो. काही दिवसांपूर्वी ती सामान खरेदी करण्यासाठी बाहेर गेली होती. अचानक ती घरी परतल्यावर पाहिले तर पती विवस्त्रावस्थेत होता. त्याने मुलीचे पूर्ण कपडे काढलेले होते. हे पाहून मी त्याच्यावर ओरडले, तर त्याने मला जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर ती सदर बाजारमध्ये राहणाऱ्या आपल्या बहिणीच्या घरी मुलींना घेऊन पळून गेली.


आधी सावत्र, मग स्वत:च्या मुलांसोबत करायचा अश्लील कृत्य
महिलेने सांगितले की, आरोपी पतीशी 11 वर्षांपूर्वी दुसरा निकाह झाला होता. आधीच्या लग्नापासून तिला एक 7 वर्षांची मुलगी आणि 11 वर्षांचा मुलगा आहे. पहिल्या पतीपासून 15 वर्षांची मुलगी होती. तिन्ही मुलांसोबत ती तिच्याजवळ राहत होती. आरोपीला नशा करण्याची सवय आहे. आधी मोठ्या मुलीवर वाईट नजर ठेवायचा, यामुळे तिला माहेरी सोडून आले होते. यानंतर तो आपल्या दोन्ही मुलांसोबतही अश्लील कृत्य करायचा. तो मुलांना मोबाइल किंवा टीव्हीवर अश्लील चित्रपट दाखवून त्यांच्याशी घाणेरडे चाळे करायचा. पोलिसांनी आरोपीविरुद्ध महिलेच्या तक्रारीवरून पॉक्सो अॅक्टमध्ये झीरोने केस दाखल करून डायरी जिवाजीगंज पोलिस स्टेशनला पाठवली आहे.

 

पत्नी म्हणाली- पाशवीपणा एवढा की, कुणी विचारही करणार नाही
सदर बाजार टीआय सविता चौधरी म्हणाल्या की, महिला आपल्या पतीच्या पाशवी वृत्तीमुळे खूप भ्यायलेली आहे. आधी आमच्या टीमने तिचे समुपदेशन केले. मग तिने पतीद्वारे मुलांवर करण्यात आलेल्या पाशवी कृत्यांची जी माहिती दिली, तिचा विचारही कुणाच्या मनात येणार नाही. महिलेने सांगितले की, तिचा पती उज्जैनचा लिस्टेड गुंडाही आहे. तो अवैध दारूविक्री करतो. त्याची माहिती उज्जैन पोलिसांना पाठवण्यात आली आहे. शहरात सुरू झालेल्या ऊर्जा डेस्कची ही पहिलीच कारवाई आहे.  

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी माहिती... 

 

 

बातम्या आणखी आहेत...