आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking Crime: एका महिन्याच्या मुलीवर तुटून पडला बाप, सेक्शुअली असॉल्ट केल्यावर एवढे क्रौर्य की प्रत्येक जण झाला शॉक्ड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्सास - अमेरिकेत एका बापाच्या क्रौर्याची कहाणी समोर आली आहे. हा व्यक्ती नशेत तर्रर होऊन आपल्या अवघ्या महिनाभराच्या मुलीवरच तुटून पडला होता. त्याने चिमुरडीला सेक्शुअली असॉल्ट करण्याबरोबरच तिची बरगड्या आणि पायही तोडून टाकले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा चिमुरडीची हालत पाहून हादरून गेले. तथापि, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी चिमुरडीचा जीव वाचवण्यात यश आले आहे. 4 वर्षांपासून हे प्रकरण कोर्टात आहे आणि जेव्हा जजनी बापाच्या अत्याचारांची कहाणी ऐकली तेव्हा त्याला 244 वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.

 

घरातून या अवस्थेत आढळली होती चिमुरडी
- घटना अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील वाको शहरात मार्च 2014 मध्ये घडली. पोलिसांना 27 वर्षीय पैट्रीशियो मेडिनाच्या घरातून चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराची माहिती मिळाली होती.
- पोलिसांच्या मते, जेव्हा त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा चिमुरडीची अवस्था पाहून शॉक्ड राहिले. चिमुरडीला तिच्या वडिलांनीच सेक्शुअली असॉल्ट केले होते आणि तिच्या शरीरावर प्रचंड जखमा होता.
- बापाच्या क्रौर्यामुळे तान्हुलीच्या फासळ्या आणि पाय मोडले होते. तिच्या शरीरावर चावल्याच्याही खुणा होत्या. दुसरीकडे, बाप मेथ हायडोसमध्ये पडलेला आढळला, त्याला अटक करण्यात आली.

 

काय म्हणाले न्यायाधीश?
- हे प्रकरण जेव्हा कोर्टापुढे पोहाचेले तेव्हा जजही आरोपी बापाच्या क्रौर्याची कहाणी ऐकून दंग झाले. ते म्हणाले की, हा सर्वात भयंकर गुन्हा आहे, जो या व्यक्तीने केला आहे. ज्याच्यावर बाळाच्या सुरक्षिततेची जबाबदारी होती, त्यानेच पाशवी कृत्य केले. 
- जज म्हणाले की, जो व्यक्ती या चिमुरडीला या जगात घेऊन आला, त्यानेच आपल्या लैंगिक इच्छेखातर तिच्या शरीराची चाळणी केली. येथे कुंपणानेच शेत खाल्ले आहे.
- जज म्हणाले की, ईश्वराचे आभार, त्याने चिमुरडीची हत्या केली नाही, पण त्याने चिमुरडीची आत्मा मात्र कायमची मारून टाकली आहे. असे म्हणत जजनी आरोपी बापाला 244 वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली, सोबतच साडे 7 लाखांचा दंडही ठोठावला आहे.

 

नंतर बाळाला एका कुटुंबाने घेतले दत्तक
- कोर्टाने चिमुरडीची आई लिसा मोन्टोया यांनाही याप्रकरणी दोषी ठरवले. तिला बाळाच्या जिवाला धोका होईल अशी परिस्थितीत एकटी सोडल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.
- ती मुलगी आता 4 वर्षांची झाली आहे आणि एका कुटुंबासोबत राहत आहे. तिला एका कुटुंबाने दत्तक घेतले आहे. या कुटुंबाने त्या मुलीसेाबतच तिच्या दोन बहीणभावांनाही दत्तक घेतले आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाचे आणखी Photos...  

 

 

बातम्या आणखी आहेत...