आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईची बाजू घेणाऱ्या 13 वर्षीय मुलाचा बापानेच केला हालहाल करून खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- आपला मुलगा नेहमीच त्याच्या आईची बाजू घेतो, या क्षुल्लक कारणावरून सख्ख्या बापाने पोटच्या १३ वर्षीय मुलाचा गळा आवळून व दगडाने डोके ठेचून खून केला. अंगावर शहारे आणणारी ही घटना कळमनुरी तालुक्यात कुर्तडी फाटा येथे शुक्रवारी रात्री घडली. बाबूराव भगवानराव शिखरे (३५) असे या सैतानी पित्याचे तर वैभव असे मुलाचे नाव आहे.

 

बाबूराव व पत्नीत वारंवार खटके उडत होते. मुलगा वैभव हा आईला साथ देत आहे, हे पाहून बापाला मुलाविषयी खुन्नस निर्माण झाली. याच रागातून नराधम बापाने आपल्या निष्पाप मुलाचाच काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार आरोपीने स्वतःच्या मुलाला 'तुला मामाकडे घेऊन जातो' असे म्हणून ऑटोमध्ये बसवून घराबाहेर काढले. नांदेड- हिंगोली रोडवरील कुर्तडी फाट्यावर ऑटो थांबवून रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मुलाला शिवीगाळ व मारहाण केली. मुलाचा पहिल्यांदा दोरीने गळा आवळला. परंतु, त्यातही त्याचा जीव जात नाही हे पाहून केसाला धरून त्याचे डोके ऑटोवर जोरात आदळले. त्याची तडफड वाढल्याने त्याला ऑटोबाहेर काढून जमिनीवर लोळवले आणि डोक्यात मोठा दगड घातला. त्यामुळे त्याच्या डोक्याचा पूर्णत: चेंदामेंदा झाला.

 

आरोपी ऑटोचालक :

आरोपी बाबूराव शिखरे ऑटोचालक आहे. आर्थिक स्थिती जेमतेम. पत्नीशी नेहमीच वाद होत असल्याने घरात नेहमीच अशांतता असे. घटनेच्या दिवशी पत्नीशी त्याचा वाद झाला होता. या वादात मृत वैभवने आईला भांडू नको असे बापाला सुनावले होते. त्यातच त्याने हे राक्षसी कृत्य केले. मृताचा चुलत भाऊ अरविंद शिखरे याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... घटनेचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...