Home | National | Other State | father murders son who was protesting his illicit relation with daughter in law in Jalandhar

सुनेसोबत अनैतिक संबंध ठेवायचा 65 वर्षांचा सासरा, विरोध करणाऱ्या मुलाचे कुऱ्हाडाने केले 6 तुकडे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 14, 2019, 11:33 AM IST

मृतदेहाचे तुकडे पोत्यांमध्ये भरून निघाला असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

  • father murders son who was protesting his illicit relation with daughter in law in Jalandhar

    जालंधर - अनैतिक संबंधांमध्ये आंधळा झालेल्या एका 65 वर्षीय नराधमाने आपल्याच मुलाची निर्घृण हत्या केली. आरोपी आपल्या 35 वर्षीय सुनेसोबत अनैतिक संबंध ठेवत होता. यासंदर्भात मुलाला कळाले तेव्हा त्याने वडिलांना विरोध केला. त्यावर आरोपी इतका संतापला की त्याने मुलगा झोपेत असताना त्याच्यावर अचानक हल्ला केला. तसेच कुऱ्हाडाने त्याच्या शरीराचे 6 तुकडे केले. यानंतर दोन पोत्यांमध्ये ते तुकडे भरून मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना तो पकडला गेला. पोलिसांनी मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात हत्येचा खटला दाखल करून त्याला अटक केली.


    पीडित युवकाचे नाव राजविंदर असून तो आपले वडील छोटा सिंग, भाऊ राजबीर सिंग आणि पत्नीसोबत राहत होता. याच दरम्यान वडील छोटा सिंगने राजविंदरच्या पत्नीवर बलात्कार केला. यानंतर तिच्यावर दबाव टाकून अनेक वेळा शारिरिक संबंध प्रस्थापित केले. अखेर एक दिवस पीडित महिलेने आपली आपबिती पती राजविंदरला सांगितली. याच गोष्टीवरून मंगळवारी मुलगा राजविंदर आणि वडील छोटा सिंगमध्ये जोरदार वाद पेटला. राजविंदरचा भाऊ राजबीरने दिलेल्या माहितीनुसार, भांडणाच्या रात्री राजविंदर झोपेत असताना अचानक छोटा सिंगने त्याच्यावर कुऱ्हाडीने प्रहार केले. ठार मारल्यानंतर मृतदेहाचे सहा तुकडे केले. तसेच हे तुकडे पोत्यांमध्ये भरून विल्हेवाट लावण्यासाठी निघाला होता. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांना बोलावण्यात आले आणि नराधमाला अटक करण्यात आली.


    मुलगाच म्हणतो, माझ्या बापाला फाशी द्या...
    राजविंदरचा जीव घेणारा छोटा सिंगने नात्याच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. माझ्या मोठ्या भावाला दोन मुलं होती नराधमाने त्यांचा देखील विचार केला नाही. अशा या बापाला न्यायालयाने फाशीच द्यायला हवी असे भावनिक आवाहन पीडित राजविंदरच्या भावाने केले आहे.

Trending