आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियंता वधू मुलीची पित्याने काढली घोड्यावरून वरात, मुलगा व मुलगी यांतील भेदभावाच्या दरीला लावला सुरुंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती : लग्न म्हटले की घोड्यावर फक्त नवरदेवच बसतो असेच चित्र आपल्याकडे आहे. म्हणजे नवरदेवानेच घोड्यावर बसावे, अशी पुरुषप्रधान रुढी आपल्याकडे सर्वश्रुत आहे. परंतु मुलगा व मुलगी यांतील भेदभावाच्या दरीला सुरुंग लावत मुलीची घोड्यावर मिरवणूक काढून नव्या पुरोगामी विचाराची पेरणी यशोदा नगरातील सिद्धार्थ सोनवणे या वधु पित्याने शुक्रवारी (दि. १) शहरात चर्चेची ठरली. मुला आणि मुलीमध्ये आपण कोणताही भेद पाळत नसल्याचे त्यांनी कृतीतून सर्वांपुढे मांडले आहे. 


येथील न्यायालयात स्टेनोग्राफर पदावर कार्यरत असलेल्या सिद्धार्थ सोनोने यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी शितल हिने इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युॅनिकेशन शाखेतून अभियंता पदवी घेतली आहे. दरम्यान मुळच्या जळगाव खानदेश येथील मॅकेनिकल शाखेतील अभियंता मुलासासेबत शितलचा विवाह ठरला आणि हा विवाह थाटामाटात शनिवारी (दि. २) सांयकाळी शहरात होणार आहे. दरम्यान, विवाहाच्या पूर्वसंध्येला नवरदेव राशी निघतो आणि घोड्यावर बसतो, असेच चित्र आतापर्यंत आपल्या भागात आपण आतापर्यंत पाहत आलेले आहोत. मात्र सिध्दार्थ सोनोने यांनी मुला मुलीत भेद पाळायचा नाही, असे ठरवून शितलला (दि. १) चक्क घोड्यावर बसवले. सुरूवातीला घोड्यावर बसण्यासाठी शितल काहीशी घाबरली मात्र वडिलांच्या इच्छेला कुठेही छेद द्यायचा नाही म्हणून तिने हिम्मत दाखवली आणि थेट नवरी घोड्यावर बसली. नवरदेवाच्या वरातीत ज्याप्रमाणे बॅन्ड, फटाक्यांची आतषबाजी त्याचप्रमाणे या वरातीतही पहायला मिळाली. ऊलट अलीकडे नवरदेवाच्या वरातीमागे मोजकेच नातेवाईक व लोकांची गर्दी दिसते मात्र शितल घोड्यावर बसलेली असताना परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी दिसत होती. विशेष म्हणजे घरापासून निघालेली ही वरात यशोदानगर क्रमांक एकमधून वाजत गाजत फिरत होती. ही आगळीवेगळी वरात पाहून आजूबाजूचे सर्व नागरिक कुतूहलाने या वरातीकडे पाहत होते. 


मुला मुलींत भेदभाव नको 
माझ्यासाठी मुलगा आणि मुलगी दोघेही सारखेच आहे. मी मुला मुलींमध्ये भेद पाळत नाही. ही बाब केवळ बोलून नव्हे तर करून प्रत्यक्षात करुन दाखवली आहे. मुलीलाही विवाहात मुलाप्रमाणे घोड्यावर बसवण्याची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली आहे,याचे मला समाधान आहे. सिद्धार्थ सोनोने, वधूपिता. 
 

बातम्या आणखी आहेत...