आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलियुगी पित्यानेच केला मुलीवर सलग दोन दिवस बलात्कार, गुन्हा दाखल होताच झाला फरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर : राजस्थानच्या झालावाड़ येथे लाजीरवाणी घटना घडली आहे. एका पित्याने पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी लहानपणापासूनच तिच्या आजीकडे राहत होती. आरोपी मुलीच्या आईचा देखील छळ करत होता. यामुळे महिलेने घर सोडले आहे. शनिवारी आईला शोधल्याचे सांगत मुलीचा बाप धन्ना तिला आणण्यासाठी गेला होता. मुलीला घरी घेऊन येताना वाटेतच त्याने मुलीवर बलात्कार केला.  

 

पीडित मुलीने सदर बाब आत्याला सांगितली, पण तिच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. यामुळे आरोपीला बळ मिळाले. यानंतर रविवारी धन्ना आपल्या मुलीला घेण्यासाठी आला आणि सिंघानिया गावात दुसऱ्यांदा तिच्यावर बलात्कार केला. 

 

त्यानंतर पीडिताने ही बाब तिच्या आजीला सांगितली, त्यानुसार पीडिताच्या आजीने आपल्या जावईविरूद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे आरोपीला कळताच तो फरार झाला आहे. पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.  

बातम्या आणखी आहेत...