आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देऊळगावात पोटच्या मुलीवर बापाचा बलात्कार, उमरग्यात अत्याचाराच्या दोन घटना;नागरिकांत तीव्र संताप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - हैदराबाद येथील डॉ. प्रियंका रेड्डी, बिहारमधील एका तरुणीवर अत्याचार करून त्यांना जाळण्याच्या घटनेने देशभरात संतापाची लाट आहे. या दोघींच्या चितांच्या आगीची धग कायम असतानाच राज्यात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार आणि छेडछेडीनंतर मुलीलाच जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. माणसात खरंच माणुसकी शिल्लक आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. तुगावमध्ये १४ वर्षे वयाच्या मुलीवर तिघांचा बलात्कार

मुरूम - उमरगा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार व नंतर तिचा दोघांनी विनयभंग केला. तर दुसऱ्या घटनेत  मुळज येथे मुलीची छेड काढून तिला घरासह पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तुगावमधील घटना बुधवारी तर मुळजची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी उमरगा व मुरूम पोलिसांत पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तुगाव येथे १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना बुधवारी घडली. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तीन नराधमांवर मुरूम पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 


तुगाव येथील एक अल्पवयीन मुलीवर बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नवनाथ भंडारे (२५) याने अत्याचार केला. घटनेनंतर मुलगी घराकडे परतत असताना अर्जुन साठे (३२) व मुस्तफा नाकेदार (१९) या दोघांनी तिचा विनयभंग केल्याची फिर्याद पीडित मुलीने महिला दक्षता समितीच्या सदस्या डॉ.पाटील यांच्या समक्ष मुरूम पोलिसांत दिली. मुलीच्या फिर्यादीवरून मुरूम पोलिसांत बलात्कार, विनयभंग व भारतीय दंडविधान ३७६ (३),३५४, ५०६ ,३४ अन्वये तर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली तसेच मंगळवारी त्यांना उमरगा न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.तपास उप विभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले या करत आहेत.
 

मुळजमध्ये छेड काढून मुलीस घरासह पेटवण्याचा प्रयत्न


उमरगा तालुक्यातील मुळज येथील एका महाविद्यालयीन मुलीची सातत्याने छेड काढून विनयभंग केल्याप्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार तरुणावर अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक व पोक्सोअंतर्गत सोमवारी (दि.२) रात्री गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महाविद्यालयीन युवतीने उमरगा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुळज येथील अजित लहू मुळजे हा महाविद्यालयास जात असताना वारंवार छेड काढत अश्लील इशारे करुन व लज्जास्पद कृत्य करत होता. दरम्यान, या मुलीस घरासह पेटवून देण्याचा प्रयत्न छेड काढणाऱ्यांनी केल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी (दि.१) रात्री नऊच्या सुमारास अजित मुळजे मुलीच्या घरासमोर आला व तिचे नाव घेवून ‘घराबाहेर ये’ म्हणत ओरडू लागला तसेच दारावर लाथा घालू लागला. दार न घडल्याने त्याने घराच्या दाराला आग लावली. घरातील लोकांनी आरडा ओरड केली. यानंतर शेजारील लोकांंनी आग विझवली. घटनेनंतर युवतीने सोमवारी रात्री उमरगा पोलिसांत अजित मुळजे यांच्या विरोधात तक्रार दिली असून, युवतीच्या फिर्यादीवरून बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार पोक्सो व अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तीन महिन्यांपासून बापाचा मुलीवर अत्याचार

चिखली - जन्मदाता बापच १५ वर्षांच्या मुलीला झोपेच्या गोळ्या देत तीन महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार करत असल्याचे प्रकरण देऊळगाव घुबे गावात उघडकीस आले आहे. सामाजिक कार्यकर्ते व नातेवाइकांच्या मदतीने मुलीने पोलिसांत तक्रार दिली. पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे मुलीने नातेवाइकांना याची माहिती दिल्यानंतर बापाला समजावण्याचा प्रयत्न झाला. मात्र बापाने अत्याचार सुरूच ठेवल्याने पीडित मुलगी रस्त्यावर रडत बसल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना कळवले.

बातम्या आणखी आहेत...