आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वधुपित्याचा कन्यादानास नकार; म्हणाला-माझी मुलगी मालमत्ता नाही, हा विधीही करणार नाही 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे बंगाली रीतिरिवाजानुसार झालेले एक लग्न चर्चेचा विषय बनले अाहे. या लग्नात विविध विधींदरम्यान वधुपित्याने कन्यादान करण्यास नकार दिला. 'माझी मुलगी काेणतीही मालमत्ता नाही, जी कुणालाही दिली जाईल. त्यामुळे मी हा विधी करणार नाही' असे त्याने लग्नावेळी सांगितले. 

 

या घटनेची माहिती अस्मिता घोष या तरुणीने ट्विटरवर दिली. त्यात म्हटले अाहे की, हे लग्न महिला ब्राह्मणांनी मंत्रपठण करून लावले. दरम्यान, काही लोकांनी या घटनेस एक चांगले पाऊल, तर काहींनी परंपरेविराेधात म्हटले अाहे. एकाने लिहिलेय- वधूला मालमत्ता म्हणणे चुकीचे अाहे. शास्त्रांत असे काहीही सांगितलेले नाही. तसेच धर्मास मानत नसाल तर कोर्ट मॅरेज करू शकता; परंतु असे लग्न लावून नाटक का केले जात अाहे? परंपरा नियमपूर्वक पाळा किंवा त्यावर पूर्णपणे बहिष्कार टाका. प्रत्येक बाबीत स्त्रीवाद अाणू नका, असे दुसऱ्या एका युजरने म्हटलेय. 

बातम्या आणखी आहेत...