आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मगरीचे पाय दाताने तोडून पित्याने वाचवला मुलाचा जीव 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालाबाक - फिलिपाइन्सच्या पलवन येथील बालाबाक शहरात एका पित्याने मुलास वाचवण्यासाठी मगरीशी लढा दिला. मगरीने मुलास सोडावे म्हणून तिचे पाय पित्याने दाताने तोडले. मुलावर दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. १२ वर्षांचा दिएगो अबुलहसन लहान भावासोबत नदीत अंघोळीस गेला होता. तेव्हा त्याच्यावर मगरीने हल्ला केला. मगरीने दिएगोला ओढून पाण्यात नेले. दिएगो व त्याचा भाऊ मदतीसाठी ओरडत होते. त्याचे वडील तेजदा अबुलहसन यांनी लाकडी दांडक्याने मगरीवर वार केले. त्यानंतर त्यांनी तिचे पाय दाताने तोडले. काही वेळानंतर मगरीने दिएगोला सोडले. तेजदा म्हणाले,मगरीने त्याला खोल पाण्यात नेले असते तर दिएगोचा जीव वाचवणे अवघड झाले असते. 

बातम्या आणखी आहेत...