Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | father sexually abused his daughter from past 3 years in ahmadnagar

जन्मदात्या पित्याकडूनच पोटच्या मुलीवर अत्याचार, पोलिसांच्‍या सतर्कतेमुळे फसला विवाहाचा प्रयत्‍न

प्रतिनिधी | Update - Aug 08, 2018, 11:23 AM IST

मागील तीन वर्षांपासून जन्मदाता बाप आपल्या सोळा वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करत होता.

 • father sexually abused his daughter from past 3 years in ahmadnagar

  श्रीगोंदे - मागील तीन वर्षांपासून जन्मदाता बाप आपल्या सोळा वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करत होता. भीतीपोटी ही मुलगी गप्प होती. आई व नातेवाईकांना तिने माहिती दिली, परंतु कुणीही मदत केली नाही. या मुलीचे आधी लग्न झालेल्या पुरुषाशी लग्न लावण्याचा डाव घरच्यांनी आखला होता, परंतु भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या फोनमुळे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी हा डाव हाणून पाडला. मुलीने पित्याच्या विरोधात सोमवारी रात्री फिर्याद दिली असून पोलिसांनी नराधम बापाविरोधात विनयभंग, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या कलमांन्वये गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले.

  ही मुलगी आई-वडील व भावासमवेत रहाते. वडील शेती व सेंन्ट्रीगचा व्यवसाय करतात. हे कुटुंब गावापासून लांब रहात असल्यामुळे शाळेत जाण्यासाठी कुणी जोडीदार नसल्याने वडिलांनी नववीत शिकत असताना तिला शाळेतून काढले. २०१५ मध्ये एका दिवशी घरी कुणी नसताना सायंकाळी वडिलांनी मुलीशी अश्लिल वर्तन करत शरीरसंबंधांची मागणी केली. मुलीने प्रतिकार केल्यामुळे ती नराधम बापाच्या तावडीतून बचावली. हा प्रकार मुलीने आईला सांगितला. आईने मुलीच्या वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ऐकले नाही.

  मुलीला न्याय मिळवून देण्याऐवजी आई व नातेवाईकांनी या मुलीचे आठ दिवसांपूर्वी कर्जत तालुक्यातील एका गावातील आधीच लग्न झालेल्या व्यक्तीशी लग्न जमवले. मुलीच्या एका मैत्रिणीने भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना फोनवरुन ही माहिती दिली. त्यांनी श्रीगोंदे पोलिसांना फोन केला. पोलिस निरीक्षक पोवार यांनी सोमवारी पहाटे पोलिस पथक पीडित मुलीच्या गावात पाठवले, परंतु ही मुलगी सापडली नाही. पोलिसांनी चौकशी केली असता ही मुलगी तालुक्यातीलच एका नातेवाईकाकडे असल्याची माहिती समजली. तेथे पोलिस पाठवून या मुलीला ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे विवाह रोखला गेला.


  मुलीला श्रीगोंदे पोलिस ठाण्यात आणल्यानंतर तिने आपल्या वडिलांनी २०१५ पासून लैंगिक चाळे करून विनयभंग केल्याची फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी या नराधमाला अटक केली.


  पोलिस आले नसते, तर आत्महत्या केली असती
  पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यानी दाखवलेल्या तत्परतेमुळे अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याचा प्रयत्न फसला. या मुलीची सुटका झाल्यावर तिने पित्याकडून होत असलेल्या त्रासाबाबत माहिती दिली. पोलिसांनी मदत केली नसती, तर आपण आत्महत्या करणार होतो, असेही तिने सांगितले.

Trending