आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडीलांसह रेल्वेस्थानकावर दुचाकीने जात असलेल्या बाप लेकाला वाहनाने उडवले, दोघेही जागीच ठार...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- कान्हेरी गवळी येथील बापलेकांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात दोघांचाही मृत्यू झाला. मुलगा हा जळगाव (खांदेश) येथे परीक्षा देण्यासाठी जाणार असल्याने वडील त्याला रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यासाठी जात होते. ही घटना रविवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील व्याळा ते कान्हेरी (गवळी) दरम्यान असलेल्या अंबुजा सोयाबीन तेल कारखान्याजवळ घडली. भास्कर लक्ष्मण बोरकर (५५) व ज्ञानेश्वर बोरकर (२५) असे अपघातात ठार झालेल्या पिता-पुत्राचे नाव आहे. पारस येथील विद्युत प्रकल्पात भास्कर बोरकर हे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर याची रविवारी जळगाव (खांदेश) येथे पोलिस भरतीची परीक्षा असल्याने दोघे पिता-पुत्र रेल्वे पकडण्यासाठी अकोल्याकडे मोटारसायकलद्वारा पहाटेच रवाना झाले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील अंबुजा सोयाबीन तेल कारखान्याजवळ त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, दोघांचाही घटनास्थळावरच मृत्यू झाला. अपघाताची माहीत मिळताच व्याळा चौकीच सहायक पोलिस निरीक्षक देविदास येऊल यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय अधिकारी सोहेल शेख, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी , पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी यांनीही घटनास्थळाला भेट दिली. 


पाच मुलीच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले : भास्कर बोरकर यांना पाच मुली व ज्ञानेश्वर हा एकुलता एक मुलगा होता. ज्ञानेश्वरच्या शिक्षणासाठी ते जीवाचे रान करीत होते. रविवारी ज्ञानेश्वरची परीक्षा जळगाव खांदेश येथे होती. सकाळची गावातून अकोल्याला जाण्यासाठी कोणतेही वाहन नसल्याने ज्ञानेश्वरला घेऊन अकोल्यासाठी निघाले होते. परंतु, रस्त्यातच काळाने पिता-पुत्रावर घाला घातला. भास्कर यांच्या पश्चात पाच मुली व पत्नी असा परिवार आहे.  

बातम्या आणखी आहेत...