आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्याचा नऊ वर्षे अत्याचार, अाईने दिली तक्रार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सावत्र मुलीला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर सलग नऊ वर्षे लैंगिक अत्याचार करण्याचा संतापजनक व धक्कादायक प्रकार उघडकीस आला अाहे. अत्याचारी पित्यास पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेने मामाला सांगितल्यानंतर हा प्रकार उघड झाला. पीडितेच्या आईने पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती व पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार, पीडितेच्या आईचा संशयित सुनील निमा पंथीकर (रा. टागोरनगर) याच्यासोबत २००९ मध्ये दुसरा विवाह झाला आहे. पहिल्या पतीची ही मुलगी २००९ मध्ये पाचवीमध्ये असल्यापासूनच संशयिताचा तिच्यावर डोळा होता. घरखर्च भागत नसल्याने अाई मुलीला पतीकडे सोडून अंबड येथे खासगी कंपनीमध्ये कामाला जात होती. याचा फायदा घेत संशयिताने अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी अाल्यावर बळजबरीने पकडले व अश्लील चाळे केले. याबाबत अाई अथवा इतर नातेवाइकांना काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

 

दोन दिवसांपासून ठेवले होते डांबून
संशयित पित्याने पीडितेला 'वागणूक चांगली' नसल्याने घरात डांबून ठेवले होते. तिने मामाला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर त्याने तिची सुटका केली. भाचीसोबत घडलेल्या प्रकाराने धक्का बसल्याने हा प्रकार त्याने बहिणीच्या कानावर घातला. मात्र, प्रारंभी तिने पतीवर विश्वास दाखवत 'ताे असे का करेल', असा उलट प्रश्न केला. परंतु, मुलीची भेदरलेली अवस्था पाहून मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली असता घडलेला भयानक प्रकार एेकून तिलाही प्रचंड धक्का बसला. तिने लागलीच पोलिसांत धाव घेत पतीविरोधात तक्रार दिली.

 

पहिल्या बायकोला चार मुले
संशयिताचे पहिले लग्न झाले असून, त्याला चार मुले आहेत. पीडितेच्या आईसोबत त्याचे दुसरे लग्न झाले आहे. या महिलेला त्याच्यापासून एक मुलगा आहे.

 

बातम्या आणखी आहेत...