आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांनी फसवले नसेल असे कोणीही शिल्लक नाही, अनेक फ्रॉड केले, बनावट SP बनून 4 विवाह केले आणि अनेकांना ठगले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कपूरथला - रेल्वेचा बनावट एस पी बनून फिराणाऱ्या सुरजीत सिंह या भामट्याने पोलिसांसमोर अनेक खुलासे केले आहेत. त्याने मान्य केले की, त्याने चार विवाह केले असून अनेकांना ठगले आहे. त्यापैकी दोन तरुणींवर केसही सुरू आहे. तपासात हेही समोर आले आहे की, तो आधी रेल्वेचा अधिकारी असल्याचे सांगत फसवून लद्न करायचा आणि नंतर त्यांच्या नातेवाईकांनाही नोकरीचे आमीष दाखवून फसवत होता. आतापर्यंत मुलींच्या कुटुंबांना फसवल्याचीच अनेक प्रकरणे समोर आली आहेत. 


बनावट ट्रेनिंग सेंटरद्वारेही अनेकांना चुना
पोलिसांच्या चौकशीत बनावट एसपीच्या विरोधात भटिंडा, संगरूर आणि फाजलिकामध्येही ठगवणे, अवैध शस्त्र बाळगणे आणि भाच्याला रस्ता अपघातात मारणे अशा तक्रारी मिळाल्या आहेत. आतापर्यंत सुरजितच्या विरोधात दाखल 7 प्रकरणांना दुजोरा मिळाला आहे. त्याशिवाय त्याने बनावट ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून अनेक तरुणांनाही फसवले होते. 


अनेकांना ठगले 
27 मे 2018 ला फाजिल्का जिल्ह्यात बनावट एसपी विरोधात त्याच्याच भाच्याला बेजबाबदारपणे गाडी चालवत रस्ता अपघातात ठार केल्याची तक्रार दाखल झाली होती. मेहुण्यानेच त्यांच्या विरोधात तक्रार दिली होती. तक्रारीत म्हटले होते की, त्यांचा मेहुणा रेल्वे अधिकारी असल्याचे सांगतो. त्याने त्यांच्या मोठ्या मुलाला वजीरला रेल्वेत भरती करण्याचे आमीष दाखवत दीड लाख रुपये घेतले होते. 26 मे 2018 रोजी तो माझ्या मुलाला कारमध्ये बसवून नोकरीला लावून देतो म्हणून सोबत घेऊन गेला. जाताना त्याने आणखी 80 हजार रुपये घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुरजितने फोन करून सांगितले की, गंगानगरहून परतताना रस्त्यात त्यांच्या कारचा अपघात झाला आहे. त्यात ते जखमी झाले असून उपचारासाठी गंगानगरला जात असल्याचे त्यांनी सांगितले. सायंकाळी 4 वाजता सुरजितचे वडील महल सिंह यांनी फोन करत त्यांना वजीरचा अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले. 


ट्रेनिंगसाठी घ्यायचा 2 लाख 
पोलिस तपासात समोर आले आहे की, रेल्वेतील बनावट एसपीने गंगानगर आणि लखनऊमध्ये बनावट ट्रेनिंगसेंटर सुरू केले आहेत. त्याच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणांकडून तो ट्रेनिंगचे 2 लाख रुपये घ्यायचा. गंगानगरमध्ये राहून आरोपीने हिसारच्या अनेक तरुणांनाही रेल्वे भर्तीच्या नावाखाली ठगले होते. 

बातम्या आणखी आहेत...