Home | Maharashtra | Mumbai | Father's Day Special: Although I can not give a time to Digvija, she will be understand - Fadnavis

Father's Day Special : दिविजाला वेळ देऊ शकत नसलो तरी ती समंजस आहे - फडणवीस

विशेष प्रतिनिधी, | Update - Jun 16, 2019, 09:07 AM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उलगडले लेक-बाबाचे नाते

  • Father's Day Special: Although I can not give a time to Digvija, she will be understand - Fadnavis

    मुंबई - मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा कारभार हाकताना पिता म्हणूनही देवेंद्र फडणवीस आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पाळण्याचा प्रयत्न करतात. त्यांची कन्या दिविजा पाचवीत शिकते. ‘फादर्स डे’निमित्त दिविजाच्या वडिलांनी लेकीविषयी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत...


    मी मान्य करतो की, मुख्यमंत्री झाल्यापासून दिविजाला अतिशय कमी वेळ देता येतो. परंतु दिविजा समंजस आहे आणि तिला माझ्या व्यग्रतेची कल्पनाही आहे. पण, जेव्हा केव्हा थोडा वेळ मिळतो, तेव्हा तिला आवर्जून वेळ देतो. सकाळी ती लवकर शाळेत जाते आणि मला माझे काम आटोपून घरी यायला खूप उशीर होतो. सकाळी लवकर उठायचे असल्याने ती झोपलेली असते. त्यामुळे तसा आम्हाला एकत्र वेळ मिळतच नाही. एकत्र बसून जेवण घेण्याची माझी खूप इच्छा असते. दिविजालाही तसे वाटत असते, परंतु माझ्या व्यग्रतेमुळे हे शक्य होत नाही. एक मात्र नक्की की, दिविजाला तिच्या बाबांवरील जबाबदारीची जाणीव आहे. मी घरी आल्यावर ती तिला अतिशय आनंद होतो. केवळ ५ मिनिटांत जो काय संवाद होतो, तो आम्हा दोघांनाही सुखावणारा असतो.


    तिला ब्लॅक चॉकलेट्स खूप आवडतात. पण, ते मी घेऊन देत नाही. तो विभाग तिची आई अमृता सांभाळते. तिच्या अभ्यासाकडे फार लक्ष देणे मला जमत नाही. पण, अधूनमधून तिचा अभ्यास कसा चालू आहे, याची विचारपूस मात्र मी अवश्य करत असतो. शाळेतील काही कार्यक्रमांना पालक हजर राहावे लागतात. पण तिच्या शाळेतील सर्व कार्यक्रमांनाही मला हजेरी लावता येत नाही. एकदा पीटीएची मीटिंग आणि शाळेतील एक-दोन कार्यक्रमांना मी गेलो होतो तेवढेच.


    मुलांना फिरायला आवडत असते, परंतु सतत काम असल्याने दिविजाला फिरायला घेऊन जाणे मला जमत नाही. त्यामुळे कधी तरी वेळ काढून फिरायला जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्यात नेहमीच यश येते असे नाही. माझ्या व्यग्र कार्यक्रमामुळे तिच्यासोबत फार वेळ बसून अभ्यास घेणे मला शक्य होत नाही. पण परीक्षेत तिला चांगले मार्क मिळाले की, ते पेपर्स ती आवर्जून मला दाखवते. तिच्या वाढदिवशी तरी मी तिच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करतो. कधी-कधी आम्ही त्या दिवशी एकत्र जेवतो, परंतु मी व्यग्र असेन तर मग दुसरा कोणता तरी दिवस निवडून एकत्र जेवण्याचा प्रयत्न करतो.

Trending