आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांचे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी गिल यांचा राजकारणात प्रवेश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोगा- तीन दशके पोलिस विभागात काम केलेले माजी पोलिस उपमहासंचालक परमदीप सिंग गिल यांचे नाव ऐकताच डोळ्यासमोर कडक शिस्‍तीच्‍या अधिका-याची प्रतिमा तरळते. परंतु, जेव्‍हा हा पोलिस अधिकारी मत मागताना दिसतो, तेव्‍हा तो अधिकारी हाच का हा प्रश्‍न सर्वांना पडतोय.

दोन महिन्‍यापूर्वीच या अधिका-याचा राजकीय प्रवास सुरू झाला. गिल यांचे वडील हे मोगाचे आमदार होते. दहशतवाद्यांनी त्‍यांची हत्‍या केली. तेव्‍हापासून गिल कुटुंबिय राजकारणापासून दूर होते. आता शिरोमणी अकाली दलाने त्‍यांना मोगा शहरातून उमेदवारी दिली आहे.

शहराचा विकास करण्‍यासाठी निवडणूक लढवणार असल्‍याचे यावेळेस त्‍यांनी सांगितले. परदेशातील शहरांप्रमाणे मोगातील लोकांना सुविधा उपलब्‍ध करून देणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे. मोगामध्‍ये मुलींसाठी सरकारी कॉलेज सुरू करणे ही कामे प्राधान्‍याने करणार असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले.