आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलाचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- येथील जिल्हा सत्र न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश (तिसरेे) ए. एस. सय्यद यांनी सोमवारी वडिलांचा निर्घृण खून करणाऱ्या संतोष गुणाजी दुधमल याला जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.  
 
अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील गुणाजी रुखमाजी दुधमल याने शेतीची वाटणी करताना संतोष यास कमी जमीन दिली. त्याचा राग त्याच्या मनात होता. दि. ३० एप्रिल २०१६ मध्ये गुणाजी तळणी शिवारातील मालोजी चिंतले यांच्या शेतातील आखाड्यावर असताना सायंकाळी पावणे पाच ते सहाच्या दरम्यान तेथे आला. वाटणी बरोबर करून दिली नाही या रागात त्याने लिंबाच्या लाकडाने गुणाजीच्या डोक्यावर वार केले.  यात गुणाजींचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात संतोष विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्यात एकूण १० साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. न्या. सय्यद यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी संतोष गुणाजी दुधमल याला जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. 
 

बातम्या आणखी आहेत...