आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेकीमुळे वाढतं बापाचं आयुष्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुली असणाऱ्या पालकांचं आयुष्यमान हे अधिक असतं हे नुकत्याच झालेल्या एका अभ्यासामध्ये सिद्ध झालं आहे. मुलगी असणारे पालक हे मुलगा असणाऱ्या पालकांपेक्षा दीर्घायुषी असतात असा दावा अभ्यासकांनी केला आहे.  पोलंडमधील जैगीलोनियन  युनिव्हर्सिटीमधील अभ्यासकांनी मुलीमुळे तिच्या वडिलांच्या आयुष्यमानावर काय परिणाम होतो या विषयावर संशोधन केले आहे. या अभ्यासादरम्यान चार हजार ३१० जणांची माहिती गोळा करण्यात आली. सहभागी व्यक्तींनी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यावरूनच माहिती गोळा करून संशोधकांनी निष्कर्ष काढला आहे. या संशोधनामध्ये मुलगा असणाऱ्या वडिलांच्या आरोग्यावर संततीप्राप्तीनंतर काहीच परिणाम होत नसल्याचं अढळून आलं. मात्र दुसरीकडे मुली असणाऱ्या व्यक्तींचे आयुष्यमान हे अधिक असल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले आहे. इतकंच नाही, जास्त मुली असणाऱ्या व्यक्तींचे आयुष्यमान हे जास्त असतं असंही या अभ्यासकांना दिसून आलं आहे. प्रत्येक मुलीमुळे तिच्या वडिलांचे आयुष्य ७४ आठवड्यांनी म्हणजेच दीड वर्षानी वाढते असं संशोधकांनी म्हटलं आहे.